
पुणे : बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील शेतीविषयक संशोधक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळाच्या शोधून काढलेल्या 'NMK 1 Golden' या वाणाची शासनाकडे अधिकृतपणे नोंदणी झाली आहे. याबाबत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक वाण संरक्षण अंतर्गत शेतकरी हक्क प्राधिकरणाकडून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. सीताफळाची अधिकृतपणे नोंदणी करणारे देशातील पहिले शेतकरी आहेत.
कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला काद्यांने केले मालामाल
डॉ.नवनाथ कसपटे यांनी परिश्रमपूर्वक शोधून काढलेल्या वाणापासून निर्माण झालेल्या फळाची चव, रंग, टिकाउपणा, कमी पाण्यात तग धरणारे, जमीनीच्या विविधतेत आणि वेगवेगळ्या वातावरणातही धोका नसलेले फळझाड म्हणून अल्पावधितच या वाणाची राज्यासह देशभरात व परदेशातही नावलौकिक होवून मोठ्या प्रमाणात लागवड होत गेली. हजारो शेतकऱ्यांना याचे मार्गदर्शन झाल्यानंतर सीताफळ हे पिक अनेकांचे उपजिवीकेचे साधन झाले. अनेक शेतकरी लखपती व करोडपती झाले आहेत. अनेक संशोधकांनी या ठिकाणी भेटी देवून कौतुकाची थाप दिली आहे. याबाबत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने डॉ.कसपटे यांचा गौरव करण्यात आला आहे. डॉ.कसपटे हे महाराष्ट्र राज्य सीताफळ महासंघाचे १५ वर्षे अध्यक्ष तर सध्या अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आहेत.
सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढती
शासनाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे असलेल्या अधिसूचित सीताफळ या फळाचे नावच नव्हते, त्यामुळे १ एप्रिल २०१६ मध्ये त्यांनी सिताफळ या वाणाची नोंदणी करून त्यानी संशोधित केलेल्या वाणाची नोंदणी करावी अशी मागणी केली होती. या वाणाच्या पडताळणीसाठी हिसारगट्टा (बंगलोर) येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.टी.शक्तीवेल, रवीकमार शर्मा यांच्या पथकाने डॉ.नवनाथ कसपटे यांच्या मधुबन फार्मला येथे प्रत्यक्ष भेट देवून 'NMK 1 Golden' या सिताफळाची झाडे, फुले, फळे, पाने, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन याची पाहणी करून नोंदी घेतल्या. त्यांनंतर पूरक सहमती अहवाल प्राधिकरणाकडे सादर केला होता. यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फेही डॉ.कसपटे यांना प्लॅन्ट जिनोम सेवीयर फार्मर अवार्ड २०१५ देवून गौरविण्यात आले होते.
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.