अंबड-पारनेर शेतशिवारात सूर्यफूल, बाजरी, मका, कलिंगडांचे पीक बहरले

अनेक शेतकऱ्यांनी केली सूर्यफूल, बाजरी, मका, कलिंगडांची शेती
Summer crops flourishing in Ambad Farmers cultivate sunflower millet maize and watermelon farming
Summer crops flourishing in Ambad Farmers cultivate sunflower millet maize and watermelon farmingsakal

अंबड : अंबड-पारनेर शेतशिवारात सूर्यफूल, बाजरी, मका, कलिंगडांचे पीक बहरले आहे. त्यामुळे चांगले उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा आहे. उन्हाळी बाजरीचे पिकं सध्या फुलोऱ्यात आहे. कणसे लगडली आहेत. मक्याचे पीकही बहरात आहे. धनगरपिंपरी, लालवाडी, शेवगा, हारतखेडा, हस्तपोखरी, मार्डी, कर्जत, लोणार भायगाव आदी ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड, खरबूज, खिरा, काकडीची लागवड केली.

दोन ते अडीच महिन्यांत हे पीक हाती येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी पाण्यात भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी सूर्यफुलाचेही पीक घेतले आहे. तेही सध्या बहरात आहे.

उन्हाळी पिकं हे दोन अडीच महिन्यांच्या कालावधीत लागवडीनंतर काढणीस, मळणीस येतात. खर्च, मेहनत कमी व उत्पन्नाची हमी मिळते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी बाजरी, मका, सूर्यफूल, खरबूज, टरबूज लागवडीतून उत्पन्न मिळविण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

- दिनेश काकडे, शेतकरी

खरी पिकांतून म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही. त्यातच नैसर्गिक आपत्ती, रोगराई आदी संकट ओढवल्याने केलेला खर्चही वसूल झाला नाही. यामुळे उत्पन्नाचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले होते. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतात खरबूज, टरबूज लागवड केली. त्यातून उत्पन्न निघेल अशी आशा आहे.

- दामोदर आधे, शेतकरी, धनगरपिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com