अहमदनगर शहराला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pipeline gas

अहमदनगर शहराला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस

अहमदनगर  ः पुणे, मुंबईच्या धर्तीवर नगर शहरात पाइपलाइनद्वारे गॅस (pipeline gas) देण्याची योजना सुरू होत आहे. प्रारंभी प्रभाग २, ४, ५ व ६ या प्रभागांमध्ये हे काम पुढील महिन्यात सुरू होईल. नंतर इतर ठिकाणी करण्याचे नियोजन होणार आहे.

अहमदनगर शहरात (Ahmednagar city) घरगुती गॅस पुरविण्यासाठी ठिकठिकाणी एजन्सीचे (gas agency) कार्यालये आहेत. तेथून गाड्या पाठविल्या जातात. अनेकदा उशिर झाल्यास नागरिकांना मनस्ताप होतो. शिवाय प्रत्येक टाकीमागी २० रुपये वाहतूक खर्च म्हणून काही एजन्सीज घेतात. त्याबाबतही नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा: सावधान! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे ११५ रुग्ण!

गॅस नियमित उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या काळात नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी प्रारंभी संकल्पना मांडली होती. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यांनीच यासाठी मोठा पाठपुरावा केला. हे काम आता लवकरच सुरू होत आहे.

मीटरनुसार गॅस मिळणार

पाइपलाइनचे गॅस कनेक्शन असलेल्या ठिकाणी प्रत्येक घरात मीटर लावले जाणार आहे. त्यामुळे वापरानुसार गॅससाठी पैसे द्यावे लागतील. त्यामुळे गॅस टाकीसाठी जादा पैसे देण्याचे टळणार आहे. शिवाय बुकिंगची गरज पडणार नाही. टाकीसाठी नागरिकांची धावपळ टळणार आहे.

हेही वाचा: राज्य सरकारनं थांबवलं जीनोम सिक्वेन्सिंग; सर्वाधिक रुग्ण ओमिक्रॉनचेच?

"औरंगाबाद, दौंड येथील गॅसच्या पाइपलाइनचे काम सुरू झाल्यानंतर याबाबत मी त्या वेळी आपल्या शहरातही पाइपलाइनद्वारे गॅस द्यावा, अशी संकल्पना मांडली. त्याला आता मूर्त स्वरुप येत आहे, याचे समाधान वाटते."

- स्वप्नील शिंदे, नगरसेवक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top