Ahmednagar : कॉंग्रेसला लागलीय अस्तित्वाची चिंता

स्वतःच्या पक्षाला जोडता न येणारे भारत जोडो यात्रा करीत आहेत
congress party
congress partyesakal
congress party
Congress : अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट? 'या' दोन दिग्गज नेत्यांत 'कांटे की टक्कर'

संगमनेर : स्वतःच्या पक्षाला जोडता न येणारे भारत जोडो यात्रा करीत आहेत. उद्देश चांगला नसल्यास त्याचे परिणामही वाईट होतात. नेतृत्वक्षमता, समज नसलेल्यांच्या या यात्रेमुळे देश कसा जोडला जाणार? सत्तेपासून दूर झाल्यावर काँग्रेसला देशाची नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली आहे, अशी टीका अन्नप्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केली. संगमनेर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

congress party
Congress : उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस; दिग्विजय सिंह यांच्यासह 'हे' 6 नेते रिंगणात!

पटेल म्हणाले, की ८० च्या दशकाचा व आत्ताचा अनुभव पाहता, सत्तेपासून दूर असलेला काँग्रेस पक्ष अस्वस्थ असतो. अशा वेळी सत्तेसाठी कोणतीही तडजोड करताना ते राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणी करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. देशातील पीएफआय या संघटनेवरील बंदीबाबत त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही, यावरुन याचा प्रत्यय येतो.

congress party
Maharashtra Politics :राज्यातील ईडीचे सरकार असंवेदनशील; सुप्रिया सुळे

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत आहेच, परंतु महागाई कमी करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारने स्वीकारली असून, देशातील जनतेचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी विविध योजनांचा आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.

congress party
Maharashtra Politics: मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'या' मंत्र्याचा गौप्यस्फोट

अमेरिकेप्रमाणे भारतातही आता महिला आर्थिक क्षेत्रात करीत असलेल्या विविध यशस्वी प्रयोगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच बळ मिळेल. याप्रसंगी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे, भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनील वाणी, जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.

congress party
Political News : 'विरोधी गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील'

प्रथमच गरिबाला न्याय

२०२४ पर्यंत देशातील प्रत्येकाला दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे म्हणून जागेची उपलब्धता सरकार करून देत आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील योगदानामुळे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी पोचली असून, २०३० मध्ये दुसऱ्या क्रमांकावर जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com