पंतप्रधान मोदींना जनसंसदचे पत्र; सह्याद्रीचे समुद्राला जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यात सोडा

सुनील गर्जे 
Friday, 18 December 2020

सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यामध्ये सोडून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करा.

नेवासे (अहमदनगर) : सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यामध्ये सोडून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करा, अशी मागणी भ्रष्टाचार काळापैसा विरोधी भारतीय जनसंसदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात, "देशातील 80 टक्के शेतक-याच्या वतीने आपणास आम्ही हे पत्र पाठवीत आहोत की सह्याद्रीचे घाट माथ्यावरील पाणी समुद्राला वाहून जाणारे आडवुन बोगद्याव्दारे पश्चिम वाहिनी नदयामधून दुष्काळी भागात सोडुन दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करावा. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आम्ही 27जून 2018 ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र पाठविले होते. 

केंद्र सरकारच्या जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयलाही पत्र लिहिले. तत्कालीन केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2018 रोजी नाशिक येथील सभेत ठाण्या जवळ धरण बांधण्यासाठी 30 हजार कोटीची घोषणा केली होती. या प्रकल्पामुळे नाशिक, नगर, मराठवाडा, विदर्भासह गुजरातचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल असे जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या जीवनाचा हा महत्वाचा प्रश्न कायम स्वरुपी सुटेल अशी आम्ही विश्वासाने गृहित धरले. त्या घोषणाची अमंलबजावनी होईल व ती घोषणा खोटी होणार नाही असा आम्हास विश्वास आहे.

हेही वाचा : घंटा वाजली! विद्यार्थी अजूनही शाळेची पायरी चढताना दिसेनात
पद्मभुषण (स्व)  बाळासाहेब विखे पाटील हे खासदार असतांना त्यांनी सलग 25/30 वर्ष वरील धरणाच्या पाणाचा सर्वे करुन फाईल तयार केली होती. महाराष्ट्राचा दुष्काळी भागाचा पाणी कायमस्वरुपी प्रश्न सोडवयाचा असेल व  दुष्काळमुक्त महाराष्ट्र करावयाचा असेल तर हे घाट माथ्यावरील पाणी आडवणे गरजेचे आहे. असे प्रश्न मांडून त्याला चालणा देण्याचा प्रयत्न केला. 
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनीही मंत्री गडकरी  यांचेकडे हाच पाणी प्रश्नाचा मुद्दा माडला त्यांनी त्याला संमती दिली होती. असे अनेक वर्षापासुन प्रयत्न झाले. मोदी सरकारच्या काळातच याप्रश्नाला यश येईल असे वाटते. केंद्र सरकार तो प्रकल्प करील अशी जनतेला अपेक्षा आहे. 

युती सरकाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री असतांना प्रत्येक सभेमध्ये 5 वर्षात धरणाचे पाणी आणुन देईल. नगर- नाशिक, मराठवाडा, विदर्भ व संपुर्ण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवू असे सांगितले. त्यावेळी आजचे आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ही त्यांचे सोबत होते. त्याला त्यांची संमती होतीच. आज मात्र आघाडी सरकार याप्रश्नावर बोलण्यास तयार नाही. घाट माथ्यावरील पाणी पश्चिम वाहिनी नद्यांत सोडणे हा शेतक-याचा जिवन मरणाचा प्रश्न आहे. त्याची कोणीच दखल घेतलेली दिसत नाही.  दर वर्षी दुष्काळावर हजारोकोटी रुपये खर्ची पडतात. धरणाच्या किमती पेक्षाही जास्त पैसे खर्ची पडतो. शेतकरी समृद्ध करायचा असेल तर शेतीला पाणी व शेतमालाला हामीभाव देणे हाच उपाय आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी सुखी पहावा वाटत असेल तर शेतक-याला त्यां पायावर उभा करावयाचा असेल तर सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नदयामध्ये सोडून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करा अशी मागणी करण्यात आली आहे.

या पत्रावर भ्रष्टाचार काळापैसा विरोधी भारतीय जनसंसदचे नेवासे तालुका अध्यक्ष रामराव भदगले, ॲड. विठ्ठल जंगले,  एस. आर. शिंदे, मारुती भोगे आदींच्या सह्या आहेत. या पत्राच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्री यांना ही पाठविण्यात आल्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter from Jan Samvad Sanghatana to Prime Minister Narendra Modi