esakal | "पीकविमा योजनेचे निकष बदलावेत"
sakal

बोलून बातमी शोधा

"पीकविमा योजनेचे निकष बदलावेत"

आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘मी कृषीमंत्री असताना पीकविमा योजना प्रभावीपणे राबविली होती. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता.

"पीकविमा योजनेचे निकष बदलावेत"

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

कोल्हार (अहमदनगर) : ‘‘सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा (crop insurance scheme) कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याउलट, विमा कंपन्यांचाच फायदा झाला. त्यामुळे पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करून सरकारने कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित पाहण्याची गरज आहे,’’ असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.

हेही वाचा: नगरमध्ये ‘वीकेंड’चा फज्जा! व्यवसायिकांचे मागच्या दाराने व्यवहार सुरूच

कोल्हार बुद्रुक (ता. राहाता) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांचे वडील विठ्ठलराव घोलप यांचे नुकतेच निधन झाले. विखे पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी पीकविम्याबाबत, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत येत असलेल्या अडचणी विखे पाटलांपुढे मांडल्या. मनकर्णाबाई घोलप, पोपट, गजानन, मच्छिंद्र व डॉ. संजय घोलप बंधू, राहाता बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब कडू, शशिकांत घोलप, सरपंच उमेश घोलप, जावेद शेख उपस्थित होते.

हेही वाचा: पारनेरमधील 77 गावांमध्ये कडक निर्बंध; कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक

विखे पाटील म्हणाले, ‘‘मी कृषीमंत्री असताना पीकविमा योजना प्रभावीपणे राबविली होती. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता. सध्याच्या सरकारने मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली. विमा कंपन्यांचाच सर्वाधिक फायदा झाला. त्यामुळे या योजनेचे निकष बदलण्याची मागणी मी सरकारकडे केली आहे.’’

हेही वाचा: कोल्हार भगवतीपूरला दर शनिवारी लॉकडाउन

लसीकरणाबाबत नाराजी

गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोनगाव, सात्रळ व धानोरे (ता. राहुरी) पंचक्रोशीतील लसीकरणातील हलगर्जी कारभाराविषयी नाराजी व्यक्त करून विखे पाटील म्हणाले, ‘‘कोल्हारच्या आरोग्य केंद्राने गाव तेथे लसीकरणाची मोहिम नियोजनबद्ध राबविली. त्यामुळे लाभार्थींची लसीकरणाबाबत तक्रार नाही. पंचक्रोशीतील वरील गावांमध्ये लसीकरणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्याशी बोलू व आरोग्य केंद्राशी संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना देऊ.’’

loading image