esakal | पारनेरमधील 77 गावांमध्ये कडक निर्बंध; कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

पारनेरमधील 77 गावांमध्ये कडक निर्बंध; कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक

पारनेर तालुक्यातील ७७ गावे कोरोना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्या गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पारनेरमधील 77 गावांमध्ये कडक निर्बंध; कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण (Corona patient) काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सुमारे १५ दिवसांपासून पारनेर (Parner) तालुक्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता तालुक्यातील ७७ गावे कोरोना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्या गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा: कोरोना रुग्ण वाढल्याने पारनेर तालुक्यातील 21 गावांत पुन्हा लॉकडाउन

कडक निर्बंध लादण्यात आलेल्या तालुक्यातील ७७ गावांतील सरकारी कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे. तसेच, कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना या गावांतील कोरोना समितीने करायच्या आहेत. बाहेरगावांहून आलेल्या पाहुण्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, बाधित रुग्णांना कोरोना सेंटरमध्ये पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत त्यांना घरी विलगीकरण कक्षात ठेवता येणार नसल्याचाही आदेश कोरोना समितीस दिला आहे.

हेही वाचा: पारनेर येथे अप्रकाशित गिरिदुर्ग 'भोरवाडी' किल्ल्याचा शोध

या गावांमध्ये आज रविवारी कडक ‘बंद’ पाळण्यात यावा, असेही जाहीर केले आहे. प्रत्येक गावात लोकसंख्येनुसार किमान रविवारी व सोमवारी किमान चारशेपर्यंत कोरोना चाचण्या करणे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा: पारनेर तालुक्‍यात २० हजार एकर जमिनीचा गैरव्यवहार

लग्नसमारंभांचे शासकीय शुटिंग

लग्नसमारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना आता प्रवेशच दिला जाणार नाही. त्यासाठी मंडपाच्या दारातच शुटिंग होणार आहे. प्रत्येक समारंभाच्या ठिकाणी कोरोना तपासणी कॅम्प घेण्यात येणार आहे. नवरदेव व नवरीसह ५० जणांच्या प्रवेशानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

- ज्योती देवरे, तहसीलदार

हेही वाचा: पारनेर तालुक्यातील ३४ गावांत कोविड सेंटर

वऱ्हाडींमध्ये धास्ती

नवरी किंवा नवराच पॉझिटिव्ह निघाला तर लग्न थांबविणार का, किंवा वरमाई-वरबाप पॉझिटिव्ह निघाले तर त्यांनाही मंडपात प्रवेश देणार नाही का, या भीतीने नवरा-नवरीसह वरबाप व वरमाई चिंताग्रस्त झाले आहेत.

हेही वाचा: पारनेर तालुका पाच दिवसांसाठी लॉकडाउन

संवेदनशील गावे

पारनेर शहरासह कळस, सारोळा आडवाई, गाडीलगाव, जातेगाव, वडगाव सावताळ, वासुंदे, देवीभोयरे, मांडवे, कुरुंद, काकणेवाडी, वनकुटे, धोत्रे, पिंपळगाव रोठा, धोत्रे, हकिगतपूर, निघोज, जवळा, पिंप्री जलसेन, कुरुंद, जातेगाव, सुपे, जामगाव, शहांजापूर, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, हिवरे कोर्डा, नारायणगव्हाण, नांदूर पठार, सावरगाव, वासुंदे, गाडीलगाव, वाळवणे, वाडेगव्हाण, पठारवाडी, गुणोरे, वडझिरे, ढवळपुरी, काळकूप, वडुले, कर्जुले हर्या, पोखरी, पाडळी आळे, भांडगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ, वडनेर, मोरवाडी, कोहोकडी, यादववाडी, कडूस, वडनेर हवेली, विरोली, चिंचोली, रायतळे, वनकुटे, रेनवाडी, बाभूळवाडे, धोत्रे खुर्द, ढोकी, सांगवी सूर्या, म्हसे, हत्तलखिंडी, कारेगाव, लोणी हवेली, भोंद्रे, वारणवाडी, गाजदीपूर, खडकवाडी, पळशी, तास.

loading image