

श्रीरामपूर : केंद्रातील मोदी सरकार शेतकरी, कामगार, आदिवासी, महिलांपासून पूर्णपणे तुटले आहे. सरकारचे धोरण हे उद्योगपतींना फायदेशीर ठरेल असेच असून, अदानी-अंबानींसारख्या काही धनिकांच्या सेवेसाठीच हे सरकार कार्यरत आहे, असा घणाघात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांनी केला.