गडकरींनी दाखवलं नवीन स्वप्न; पाण्यातील हायड्रोजनवर चालणार विमान अन् रेल्वे

काही दिवसांपूर्वी गडकरींनी येत्या काळात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक आणणार असल्याची घोषणा केली होती.
Nitin Gadkari
Nitin GadkariSakal

अहमदनगर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही आगळ्या वेगळ्या घोषणा करत असतात. काही दिवसांपूर्वी गडकरींनी येत्या काळात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) आणि ट्रक (Truck) आणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी चक्क पाण्यातून हायड्रोजन (Water Hydrogen) वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याची घोषणा केली आहे. (Nitin Gadkari On Water Hydrogen )

एवढेच नव्हे तर, मी परिवहन मंत्री असून, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो असं म्हटले आहे. त्यांच्या या आत्मविश्वासानंतर खरंच येत्या काळात पाण्यातील हायड्रोजन वेगळं काढून विमान (Flight) आणि रेल्वे (Railway) प्रत्यक्षात चालणार असे वाटू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रमात ते बोलत होते. (Nitin Gadkari Akole News)

गडकरी म्हणाले की, अहमदनगरमध्ये पेट्रोलला (Petrol) हद्दपार करा, कार आणि बस इथेनॉलवर (Ethanol) चालवा. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजी (CNG) वर आहे, आपला शेतकरी अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनला पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले. येत्या काळात साखरे ऐवजी अन्न पदार्थाकडे वळण्याची गरज असून, आजची स्थिती गहू स्वस्त तर ब्रेड महाग आणि टोमॅटो स्वस्त तर सॉस महाग अशी आहे. देशात साखर सरपल्स आहे त्यामुळे येत्या काळात साखरेऐवजी अन्य पदार्थाकडे वळण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com