esakal | ‘डोन्ट वरी’दुकाने शुक्रवारपासून उघडणार, कोरोनाची चाचणी करावी लागणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Don't Worry shop to open from Friday, corona to be tested!

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू वगळता बंद असलेली इतर प्रतिष्ठाने शुक्रवार, ता. ५ मार्चपासून नियमानुसार उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी परवानगी दिली. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कोविड-१९ नियमांचे पालन करून प्रतिष्ठाने उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे.

‘डोन्ट वरी’दुकाने शुक्रवारपासून उघडणार, कोरोनाची चाचणी करावी लागणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू वगळता बंद असलेली इतर प्रतिष्ठाने शुक्रवार, ता. ५ मार्चपासून नियमानुसार उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी परवानगी दिली. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कोविड-१९ नियमांचे पालन करून प्रतिष्ठाने उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गामुळे अकोला महानगरपालिका क्षेत्रात ता. ८ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हमून अंशतः लॉकडाउन करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यापूर्वी सर्व व्यावसायिकांची व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक असेल, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीला सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
..........................
...तर पुन्हा कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करून शुक्रवारपासून प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांवर पंधरा दिवस किंवा एक महिना सील करण्याची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
.................
ही परवानगी तात्पूर्ती
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या बघता व भविष्यात त्यात वाढ झाल्यास लॉकाडाउन कडक करण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी शुक्रवारपासून दुकाने उघडण्यास दिलेली परवानगी ही रद्दही केली जाऊ शकते. सध्या दिलेली परवानगी ही तात्पूर्ती असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
....................
आज जाहीर होणार नियमावली
व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत शुक्रवारपासून प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील संपूर्ण नियमावली व जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकृत आदेश गुरुवारी प्रशासनातर्फे जाहीर केला जाणार आहे.
..................
व्यापारी संघटनांनी केले चाचणीचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांना व त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करूनच व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी स्वतःसह प्रतिष्ठानात काम करणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन विदर्भ चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. नितीन खंडेलवाला यांनी व्हिडिओ संदेशातून सर्व व्यापाऱ्यांना चाचणी करून घेण्याची विनंत केली आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग

loading image
go to top