esakal | राठोडांच्या राजीनाम्यापेक्षा भाजपचे ‘मौन’च चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News BJPs silence is more in the discussion in Washim than Rathore's resignation

संपूर्ण राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भारतीय जनता पक्ष आंदोलन करीत असताना वाशीम जिल्ह्यात मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्याने तोंडातून अवाक्षरही काढले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपच्या या ‘मौन’मागे नेमके कारण काय? याचा आता राजकीय वर्तुळात कीस पाडला जात असून, राज्यस्तरीय भूमिकेला मतपेटीने मात दिल्याची चर्चा आहे.

राठोडांच्या राजीनाम्यापेक्षा भाजपचे ‘मौन’च चर्चेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : संपूर्ण राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भारतीय जनता पक्ष आंदोलन करीत असताना वाशीम जिल्ह्यात मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्याने तोंडातून अवाक्षरही काढले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपच्या या ‘मौन’मागे नेमके कारण काय? याचा आता राजकीय वर्तुळात कीस पाडला जात असून, राज्यस्तरीय भूमिकेला मतपेटीने मात दिल्याची चर्चा आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत होते.

संजय राठोड यांनी पोहरादेवीत येवून शक्तीप्रदर्शन करीत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते, मात्र भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने शिवसेनेला खिंडीत पकडण्यासाठी रणनिती आखत राज्यस्तरावर धुरळा उठविला होता. भाजपचे अनेक बडे नेते, प्रवक्ते शिवसेना व संजय राठोड यांच्या विरोधात तुटून पडत होते.

संजय राठोड यांच्या पोहरादेवीतील शक्तीप्रदर्शनानंतर, तर आरोपाला धार आली होती. इकडे पोहरादेवी ज्या कारंजा मतदारसंघात त्या कारंजा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी हे करतात.

तसेच ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षही आहेत. सध्या ते मुंबईत उपचार घेत असले, तरी पक्षाची भूमिका व पक्षाने सांगीतलेली आंदोलने करण्यासाठी भाजपकडे मोठी चमू आहे. मात्र संजय राठोड प्रकरणात जिल्ह्यामधे भाजपच्या गोटातून अवाक्षरही न निघाल्याने जिल्ह्यात भाजपच्या या भूमिकेची एकच चर्चा आहे.
------------------------------
मतपेटी ठरली भूमिकेपेक्षा भारी
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी आहेत. या मतदारसंघात बंजारा समाजाचे प्राबल्य आहे. संजय राठोड यांच्यासोबत संपूर्ण बंजारा समाज खंबीरपणे उभा राहिल्याने संजय राठोड यांच्या विरोधात भूमिका न घेणे हा मतपेटीचा डाव भाजपने खेळला असावा अशी एक चर्चा आहे, तसेच संजय राठोड वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री असताना संजय राठोड यांचे स्वकीयापेक्षा आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासोबत गुळपीठ जमत होते हा इतिहासही आता चर्चेचा विषय झाला आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग

loading image
go to top