esakal | मुलगी झाली हो ऽऽऽ!  मि्ळणार ‘बचती’ची भेट, कारखेडा ग्रामपंचायतचे कौतुकास्पद उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

A gift for the birth of a daughter, an innovative initiative of Karkheda Gram Panchayat

 मुलीचा जल्मदर वाढविण्यासाठी मुलगी जल्मताच १८ वर्षांसाठी एक हजार रूपये फिक्स, गावातील शेकडो महिलांना विमा सुरक्षा कवच, निराधार महिलांना महिन्याकाठी मोफत धान्य तालुक्यातील कारखेडा येथील नवनियुक्त सरपंचा सोनाली सोळंके यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारताच जनहिताच्या मोठ्या घोषणा केल्या. त्या घोषनेची अमलबजावणी तातळीने करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मुलगी झाली हो ऽऽऽ!  मि्ळणार ‘बचती’ची भेट, कारखेडा ग्रामपंचायतचे कौतुकास्पद उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम) : मुलीचा जल्मदर वाढविण्यासाठी मुलगी जल्मताच १८ वर्षांसाठी एक हजार रूपये फिक्स, गावातील शेकडो महिलांना विमा सुरक्षा कवच, निराधार महिलांना महिन्याकाठी मोफत धान्य तालुक्यातील कारखेडा येथील नवनियुक्त सरपंचा सोनाली सोळंके यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारताच जनहिताच्या मोठ्या घोषणा केल्या. त्या घोषनेची अमलबजावणी तातळीने करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कारखेडा गावच्या नवनियुक्त सरपंचा सोनाली सोळंके व उपसरपंच अनिल काजळे यांनी मंगळवारी (ता.२) गाव हिताच्या दृष्टी कोणातून महत्त्वकांक्षी घोषणा केल्या. त्यामध्ये संपूर्ण महिलांना विमा सुरक्षा कवच देणार, स्त्री भ्रृण हत्या थांबविण्यासाठी व मुलीच्या जल्मदरात वाढ होण्यासाठी मुलगी जल्मताचा मुलीच्या नावे एक हजार रूपये १८ वर्षासाठी फिक्स ठेवणार आहेत. शिवाय मुलीला जन्म देणाऱ्या माता-पिताचा सत्कार होणार आहे, घरचा कर्ता पुरूष गेल्याने निराधार झालेल्या कुटुंबाना महिन्यासाठी मोफत धान्य दिले जाणार आहे. त्याआधी ते कुंटूब अंत्योदय खाली आणण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आला आहे. गावात चालू असलेली पिठगिरणी आगामी काळात सुद्धा चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ग्रामसेवक अनिल सूर्य, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चव्हाण, गणेश जाधव, वर्षा देशमुख, दिलीप देशमुख, मनोज तायडे, प्रभाकरराव भोयर, लक्ष्मणराव मात्रे, सुभाष परांडे, किशोर देशमुख, राजू राऊत, गुणवंत राऊत, गोपाल देशमुख, मोहन जाधव, देवराव पिंगाने यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग

loading image