पुन्हा संकट; दिव्यांग शेतकर्‍यांचे डोळ्यात पाणी,

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 19 February 2021

मेहकर तालुक्यात बुधवारी (ता.17) रात्री जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका उभ्या पिकांची अवकाळी पावसाने नुकसान झाले. सध्या रब्बी हंगामातील विविध पिकाची काढणी सुरू आहे. त्यातील गहू, हरभरा आदी पिकांची काढणी करून ती शेतातच पसरून ठेवली आहे.

घाटबोरी (जि.बुलडाणा)  : मेहकर तालुक्यात बुधवारी (ता.17) रात्री जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका उभ्या पिकांची अवकाळी पावसाने नुकसान झाले. सध्या रब्बी हंगामातील विविध पिकाची काढणी सुरू आहे. त्यातील गहू, हरभरा आदी पिकांची काढणी करून ती शेतातच पसरून ठेवली आहे.

त्यामुळे अचानक ढगाळ वातावरण होऊन अवकाळी पावसाने घाटबोरी परिसरात रात्री हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली होती. सकाळी शेतात जाऊन पाहणी केली असता पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आले आहे. यावेळी घाटबोरी येथील दिव्यांग शेतकरी सकाळीच शेतातील सोंगून टाकलेले हरभरा पिकाची गजला पलटी मारत होते. त्यावेळी हरभरा पिकांची गंजी मधून वाफा निघत होत्या.

हेही वाचा - Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!

त्यावेळी दिव्यांग शेतकरी सुभाष नवले यांच्या डोळ्यातून अश्रुचे बांध फुटले.
तालुक्यातील काही भागात तुरळक अवकाळी पावसाने झोडपले तर काही काढणीला आलेला गहू, ज्वारी आणि हरभर्‍याचे पीक मातीमोल झाले आहे. हाता तोंडासी आलेले पीक पाण्यात गेल्याने अनेक शेतकर्‍यांवर उपासमाळीची वेळ आली आहे. बळीराजा गेल्या तीन-चार वर्षापासून होरपळून निघत आहे. शेकडो हेक्टरवरील पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांच्या हातून गेली आहे. रब्बी हंगामातील कापणीला आलेला गहू, हरभरा आणि फळबागांना अधिक फटका बसला आहे.

हेही वाचा - धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

परिसरात विजेचा कडकडाट होऊन मेघगर्जना होत पाऊस कोसळला. त्यात गव्हाचे पीक काही ठिकाणी भुईसपाट झाले. डाळिंब, कांदा, हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे. बहरलेल्या आंब्यांचा मोहोर गळून पडला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल यंत्रणांनी तातडीने सर्व्हेक्षण करून शासनाने मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास नेहमी हिरावून घेतला जात आहे. एक तर सध्या शेतकरी कोरोनाने भयभीत झाला आहे. अशातच रात्री परिसरात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे पीक मातीमोल झाले. शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असून, प्रशासनाने  प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे. शासनाने सरसकट आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
- राजकुमार पाखरे, तालुकाध्यक्ष, भाजप किसान आघाडी, मेहकर.

अचानक रात्री अवकाळी पाऊस आल्याने शेतातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सातत्याने शेतकर्‍यांवर कधी अस्मानी, कधी सुलतानी तर आता कोरोनाच्या संकटामध्ये पुन्हा अवकाळी अशा संकटावर संकट कोसळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने बांधावर येऊन झालेल्या पिकांचे पंचनामा करून, नुकसान भरपाई देण्यात यावी.
- सुभाष तू.नवले, दिव्यांग शेतकरी, घाटबोरी.

 

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News Storm rains crisis again; Losses of disabled farmers