esakal | कोरोनाचा धोका वाढला; दिवसभरात ५६२ टेस्ट, दोघांचा मृत्यू, १७४ नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Corona threat increased; 562 tests in a day, two deaths, 174 new patients

आज दुपारनंतर दोन जणांचे मृत्यू झाले. अडगाव खुर्द ता. अकोट येथील रहिवासी असलेल्या ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास ता.९ रोजी दाखल करण्यात आले होते. मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास ता.११ रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाचा धोका वाढला; दिवसभरात ५६२ टेस्ट, दोघांचा मृत्यू, १७४ नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ५६२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३८८ अहवाल निगेटीव्ह तर १७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी दोघांचा मृत्यू झाला.


बुधवारी दिवसभरात ५६२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी १६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यात जीएमसी येथील २६, मूर्तिजापूर येथील १९, अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड, डाबकी रोड, चर्तुभुज कॉलनी व हिंगणा रोड येथील प्रत्येकी पाच, सिधी कॅम्प, रेणूका नगर, लहान उमरी, तोष्णीवाल लेआऊट व तुकाराम चौक येथील प्रत्येकी चार, रामदासपेठ, आदर्श कॉलनी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन,

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

रणपिसे नगर, मोठी उमरी, आश्रय नगर, लक्ष्मी नगर, बार्शीटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित तारफैल, पिंपरी खुर्द ता.अकोट, राधाकिसन प्लॉट, कौलखेड, संतोष नगर, मलकापूर, जीएसी क्वॉटर, बाळापूर, सातव चौक, मालीपुरा, उमरी, जयहिंद चौक, दिपक चौक, सराफा बाजार, जवाहर नगर, गीता नगर, टिटवा, रिधोरा, मोमिनपूरा, विठ्ठल नगर, दुर्गा चौक, पिंपलसिंगे, वाशिम बायपास, गोविद नगर, राऊतवाडी, विद्या नगर, स्नेहा नगर, तापडीया नगर, कापशी, चोहट्टा बाजार, गड्डम प्लॉट, खडकी, अकोट फैल, बाळापूर रोड, हिवरखेड ता.तेल्हारा, विद्युत कॉलनी, मराठा कॉलनी, आळसी प्लॉट, राम नगर, बिर्ला कॉलनी, गिरी नगर, न्यू तापडीया नगर व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूर येथील पाच, बाळापूर येथील चार, जीएमसी येथील दोन तर उर्वरित पळशी बु. बाळापूर व पातूर येथील रहिवासी आहे. दरम्यान काल रात्री (ता.१६) रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ४० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

हेही वाचा - धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

४९ जणांना डिस्चार्ज
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथून १९ असे एकूण ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - सख्या बहिणींनाच गंडा; वडिलोपार्जित जमीन मिळविण्यासाठी बहिनीच बदलल्या!

दोघांचा मृत्यू
आज दुपारनंतर दोन जणांचे मृत्यू झाले. अडगाव खुर्द ता. अकोट येथील रहिवासी असलेल्या ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास ता.९ रोजी दाखल करण्यात आले होते. मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास ता.११ रोजी दाखल करण्यात आले होते.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

loading image