Akola Crime News Womens Honey Trap to Trap Eminent Men
Akola Crime News Womens Honey Trap to Trap Eminent Men

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

अकोला :  सद्या जिल्ह्यात हनी ट्रॅपचं प्रकरण चांगलंच गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय. हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत बरं का? परंतु, सोशल मीडियाच्या माध्यातून हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात. हनी ट्रॅप बद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास एखाद्या सुंदर मुलीचे आमिष दाखवून जाळ्यात फसविणे आणि आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रकार. 

अकोल्यात अशीच एक घटना समोर आली आहे, ती अशी,  जिल्हा परिषदेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेले तेजराव जगदेव नवलकार यांना ता.२१ जानेवारी रोजी कथित प्रीती थोरात नामक युवतीने फोन करून भेटण्यासाठी बोलविले.

यानंतर नवलकर हे त्या युवतीला भेटण्यासाठी एमआयडीसी परिसरातील अप्पू टी पॉइंट जवळ गेले. यादरम्यान ती युवती त्याठिकाणी कारमध्ये आली. तेथे नवलकर यांच्या सोबत गप्पा मारू लागली.

त्यानंतर जे घडले ते भयानक होतं 
काही वेळातच तेथे तीन युवक आले. ‘आमच्या बहिणीसोबत छेडखानी का केली’, असे म्हणून नवलकर यांना मारहाण करू लागले. हे प्रकरण निपटविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. सामाजिक बदनामीमुळे तेजराव नवलकर यांनी त्या तीघांना एक लाख रुपये दिले.

या बाबतची तक्रारनंतर नवलकर यांनी पोलिस स्टेशनला दिली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम १२० ब, १७०, ३८४, ३८५, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.

या घटनेत अक्षय चिरांडे हा युवक सहभागी असल्याची माहिती तपास दरम्यान पोलिसांना मिळाली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात  गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.

या घटनेतील अक्षय चिरांडे हा युवक सहभागी असल्याची माहिती तपास दरम्यान पोलिसांना मिळाली. या युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली.अक्षय चिरांडे याने संतोष यादव, राहुल इंगळे सोबत आपण हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून चारही आरोपींना गजाआड केले.

मात्र, प्रकरण एवढ्यावरंच संपत नाही, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा हनी ट्रॅपची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा!
.......
मोठे व्यावासायिक ‘टार्गेट’
याआधी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार वर्मा यांच्या मोबाईलवर देखील एका अज्ञात युवतीने फोन करून, त्यांना भेटण्यास विनंती केली. त्यानंतर वर्मा हे गौरक्षण रोडवर तिला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवतीने त्यांना मलकापुरातील एका सदनिकेत नेले. त्या ठिकाणी हेच युवक आले होते. युवतीचा विनयभंग केल्याची आरडाओरड केली. यावरून वर्मा यांच्या सोबत तोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र,वर्मा यांनी या युवकांना भीक घातली नाही. यानंतर वर्मा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या टोळक्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com