
महारोजगार मेळाव्यास उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता मेळाव्यात अर्ज करण्यांची अंतिम तारीख २० डिसेंबरपर्यत वाढवण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील २ हजार ४०४ इच्छुकांनी अकोल्यात नोकरीसाठी ऑनलाईन मेळाव्यात नोंदणी (अर्ज) केले. परंतु जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात ३२६ जागाच असतानाही आलेल्या अर्ज संख्येने बेरोजगारीचे संकट गडद होत असल्याचे दिसून येत आहे.
अकोला : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागा मार्फत १२ व १३ डिसेंबररोजी भव्य राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
परंतु, महारोजगार मेळाव्यास उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता मेळाव्यात अर्ज करण्यांची अंतिम तारीख २० डिसेंबरपर्यत वाढवण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील २ हजार ४०४ इच्छुकांनी अकोल्यात नोकरीसाठी ऑनलाईन मेळाव्यात नोंदणी (अर्ज) केले. परंतु जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात ३२६ जागाच असतानाही आलेल्या अर्ज संख्येने बेरोजगारीचे संकट गडद होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम
वाढती बाजारपेठ, कमी किंमतीत उत्पादनाचे ठिकाण आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
या संधींच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्वत वृद्धी व विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विविध उद्योग व इतर क्षेत्रांतील संधींचा फायदा घेण्यासाठी तरुण वयोगटातील उमेदवारांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरूप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास या कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देवून केंद्र शासनातर्फे सन् २००९ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यात राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सुरुवात सन् २०१० पासून करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यस्तरावर २० डिसेंबरपर्यंत व जिल्ह्यात १२ व १३ डिसेंबररोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यामध्ये नामांकीत खासगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी अकोला जिल्ह्यासाठी ३२६ जागांसाठी ऑनलाईन (भरती प्रक्रिया) अर्ज मागितले. परंतु त्यासाठी २ हजार ४०४ इच्छुकांनी अर्ज केल्याने नोकरीसाठी बेरोजगारांची सैरभैर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
क्लिक करा - अकोला जिल्ह्यात आज काय विशेष !
आधी अर्ज, नंतर निवड प्रक्रिया
रोजगार मेळाव्यातील ३२६ जागांसाठी अर्ज करणाऱ्या राज्यभरातील २ हजार ४०४ इच्छुकांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी नोंदणी करणारे उद्योजक, कंपन्या युवकांच्या मुलाखती घेतील. त्यामध्ये निवड झालेल्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत देण्यात आली आहे.
हेही वाचा - माता न तु वैरणी, पती की बाळ सुरू होती जीवाची घालमेल, मग...
७९ युवकांना रोजगार मिळाल्याचा दावा
जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागा मार्फत डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण चार बेरोजगार ऑनलाईन मेळावे घेण्यात आले. या रोजगार मेळाव्याला ९५७ उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली. या रोजगार मेळाव्यासाठी विविध कंपण्याचे १९ उद्योजक उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यातून ७९ बेरोजगार युवक-युवतींना रोजगार प्राप्त झाल्याचा दावा विभागाने केला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)