
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून मोफत गणवेश वाटप सुरू करण्यात येणार आहे.
अकोला : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून मोफत गणवेश वाटप सुरू करण्यात येणार आहे.
मोफत गणवेश वाटप योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थिनी (मुली) तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी (मुले) तसेच दारिद्र्यरेषेखालील पाल्यांची मुले अशा एकूण जिल्ह्यातील पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे.
हेही वाचा -आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंच्या शाळा अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत.
त्यामुळे जिल्ह्यातील पात्र ६४ हजार ५१३ विद्यार्थ्यांना यावर्षी प्रत्येकी एकच गणवेश वितरीत करण्यात येणार आहे. गणवेश खरेदीसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
त्यानुषंगाने शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -