अकोला, नांदेड महामार्गाच्या कामामुळे शेतरस्ते धोकादायक

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 7 January 2021

अकोला, नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामामुळे या महामार्गाला जोडणारे रस्ते धोकादायक झाले आहेत. महामार्गापेक्षा शेतरस्ते ८-१० फूट खोल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

मालेगाव (जि.वाशीम) :  अकोला, नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामामुळे या महामार्गाला जोडणारे रस्ते धोकादायक झाले आहेत. महामार्गापेक्षा शेतरस्ते ८-१० फूट खोल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

तालुक्यात महामार्गांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे दळणवळण सुविधा अद्ययावत होत असली तरी, शेतकऱ्यांची मात्र पंचाईत झाली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल शेतातून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांचे शेतरस्ते तत्काळ संबंधित कंपनीने मुरूम टाकून भरून द्यावे अशी मागणी तालुक्यातील नागरतास मालेगाव परिसरातील शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

अकोला, नांदेड राष्ट्रीय महामार्ग हा अकोला बायपास ते नागरदास बायपास महामार्गाची कामे करताना मार्ग अधिकाधिक समतल करावा लागला. त्यात कुठे खूप मोठ्या प्रमाणात उंची वाढली तर, कुठे कमी झाली. त्यातच मार्गालगत नाल्याही खोदण्यात आल्या. त्यामुळे मार्गालगतच्या शेतात वाहन नेणे कठीण झाले आहे.

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

अकोला बायपास ते नागरदास बायपास दरम्यान तर, रोडची उंची वाढल्याने शेतकऱ्यांचे पूर्वीचे रस्ते अत्यंत खाली गेली असून शेतातून शेतमालाची गाडी रोडवर व आणणे एकप्रकारे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. नागरदास बायपास समोरील अग्रवाल पेट्रोल पंपा समोर सैलानी दर्गाकडे जाणारा रस्ता हा तर, अत्यंत धोकादायक झाला असून या राष्ट्रीय महामार्गची उंची आणि दर शेत रस्ता खूप खाली झाल्याने हा रस्ता तातडीने करून देण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी नारायण काटेकर, सुधाकर देवळे, विजय देवळे, श्रीकृष्ण देवळे, किरण पखाले, त्रिवेदी महाराज, सुनील देवळे, किसन जगताप आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शेतकऱ्यांना करावी लागत आहे कसरत
काही ठिकाणी मार्गाची उंची सहा ते आठ फूट उंच झाली तर, काही ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी झाली. त्यामुळे या मार्गालगत असलेल्या शेतीत वाहने नेण्यात अडचणी येत आहेत. मार्गाच्या उंचीनुसार शेतात मार्ग करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीतच मोठी जागा सोडावी लागत आहे.

हेही वाचा - पतंग उडविण्यासाठी शेतात गेलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

त्यामुळे शेतजमिनीच्या पेरणीचे क्षेत्र घटत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना कायमच सोसावा लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांना ही अडचण येत आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील विविध कामांसाठी शेतकऱ्यांना वाहने न्यावी लागत आहेत परंतु, मार्ग उंच झाल्याने वाहने शेतालगत मार्गावरच उभी करून साहित्य नेण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे फवारणी, डवरणी करणे अशक्य झाले असून, खताची गाडीही मार्गावर उभी करून डोक्यावर खताची पोती न्यावी लागत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Akola, Nanded Highways are dangerous due to the work of the highway