esakal | कोरोनाचा आणखी एक बळी; ३७ नवे रुग्ण, मृतकांची संख्या पोहचली ३३० वर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Another victim of Corona; 37 new patients, death toll rises to 330

 कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त एका रुग्णाचा शुक्रवारी (ता. २२) मृत्यू झाला. त्यासोबतच ३७ नवे रुग्ण आढळले. संबंधित रुग्ण लक्ष्मी नगर, खदान येथील ६६ वर्षीय महिला होती. तिला १४ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. सदर मृत्यूनंतर जिल्ह्यातील मृतकांची संख्या ३३० झाली आहे.

कोरोनाचा आणखी एक बळी; ३७ नवे रुग्ण, मृतकांची संख्या पोहचली ३३० वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त एका रुग्णाचा शुक्रवारी (ता. २२) मृत्यू झाला. त्यासोबतच ३७ नवे रुग्ण आढळले. संबंधित रुग्ण लक्ष्मी नगर, खदान येथील ६६ वर्षीय महिला होती. तिला १४ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. सदर मृत्यूनंतर जिल्ह्यातील मृतकांची संख्या ३३० झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २२) जिल्ह्यात ३०७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३७ अहवाल पॉझिटिव्ह तर २७० अहवाल निगेटिव्ह आले. सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा -राज्यात ‘वंचित’चे ३७६९ उमेदवार विजयी, प्रकाश आंबेडकर यांचा दावा 

त्यात सात महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ज्योती नगर येथील चार, डाबकी रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, तुकाराम चौक, मोठी उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन उर्वरित हिंगणा फाटा, सिंधी कॅम्प, वाशिम रोड, खानापूर, मलकापूर, आसेगाव बाजार, जठारपेठ, बाळापूर, आदर्श कॉलनी, राम नगर, मलकापूर रोड, जुने शहर, शिवणी व कौलखेड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूर येथील तीन तर उर्वरित आदर्श कॉलनी, केशव नगर, एरंडा व कृषी नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा -पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची तयारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

३६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, हॉटेल स्कायलार्क येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून १० अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा -कसा होणार विकास? रस्त्याच्या कामामध्ये होतोय मुरूम ऐवजी चक्क मातीचा वापर

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ११२७९
- मृत - ३३०
- डिस्चार्ज - १०३३६
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६१३

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -

loading image