
तालुक्यातील चारही मुख्य मार्गाचे काम सुरू आहे. पैकी तेल्हारा-हिवरखेड रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्यावर खोदकाम कमी करण्यात येत असून, त्यात मुरूम न टाकला चक्क माती टाकण्यात येत आहे.
तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील चारही मुख्य मार्गाचे काम सुरू आहे. पैकी तेल्हारा-हिवरखेड रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्यावर खोदकाम कमी करण्यात येत असून, त्यात मुरूम न टाकला चक्क माती टाकण्यात येत आहे.
तेल्हारा शहरात येण्यासाठी अडसूळ-तेल्हारा, वरवट-तेल्हारा, वनी वारुळा-तेल्हारा व हिवरखेड-तेल्हारा ही मुख्य चार रस्ते आहेत. या चारही रस्त्यांची कामं सध्या सुरू आहे. हिवरखेड तेल्हारा वगळता तिन्ही रस्त्यांवर दोन ते अडीच फूट खोदकाम केले आहे. त्यामध्ये मुरूम टाकून व्यवस्थित दवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
मात्र हिवरखेड-तेल्हारा रस्ता सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचा करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम गत वर्षी सुरू झाले होते. संबंधित कंत्रादारांने केवळ साफसफाई करून रस्त्यावरील डांबराचा थर जेसीबीने बाजूला केला व त्या बाजूची जमीन केवळ ६ इंच उकरून माती बाजूला सारून त्यामध्ये पिवळी माती टाकली होती.
परिणामी पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्यप्रमाणावर चिखल झाला होता. त्यात वाहने घसरून अनेक लहानमोठे अपघात झाले. यात दोघांना आपला जीव गमावावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग जेसीबीने चिखल बाजूला करून वाहनांना रस्ता करून देत होते. यावर्षी पुन्हा काम सुरू झाले आहे.
हेही वाचा - सीरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू
अताही केवळ पिवळ्या, काळया मातीचा भराव टाकण्यात येत आहे. पूर्वी जो डांबर रस्त्यावर होते. त्याच्या बाजूची जमीन ६ इंच उकरून माती बाजूला करून खड्ड्यात पिवळी माती टाकण्यात येत आहे. ही बाब शासकीय अधिकाऱ्यांना दिसत नाही काय, असा सवाल नागरिक करत आहेत.
नागरिकांनीच दिली प्रशासनाला माहिती
बेलखेड येथील नागरिकांनी रस्त्यावर टाकण्यात येणारी काळी माती बघून तहसीलदार याच्याशी संपर्क साधला व काम बंद केले. कामावर देखरेख करणारे सुपरवाझर विचारणा करणाऱ्या नागरिकांना व पत्रकारांना उडवाउडवीची उत्तरे देतात. सुरू असलेल्या रस्त्याचे खोदकाम किती खोल आहे? त्यामध्ये कोणते साहित्य टाकले जाणार? मुरूम, गिट्टीचे थर किती इंचाचे व किती राहतील? वरचा थर कसा असेल? रस्त्यांची उंची किती असेल? या बाबतचा सविस्तर माहिती फलक काम करणाऱ्या कंपनीने मोबाईल नंबरसह तेल्हारा व हिवरखेड येथे रस्त्या लागत लावावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
तेल्हारा-बेलखेड-हिवरखेड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. खोदकाम देखील पुरेशे केले जात नाही. संबंधित कंत्राटदाराने नियमानुसार काम करावे व माहिती फलक संपूर्ण माहितीसह लावावे.
-दादा टोहरे, नागरिक, बेलखेड
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -