50 लाखांचा अपहार; उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर बीडीओंचे विस्तार अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश

Akola Marathi News Embezzlement Rs 50 lakh; BDO extension officers ordered action after High Court quashed
Akola Marathi News Embezzlement Rs 50 lakh; BDO extension officers ordered action after High Court quashed

हिवरखेड (जि.अकोला)  :  उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर ५० लाख रुपयांच्या अपहाराच्या वसुलीसाठी तत्कालीन सरपंच शिल्पाताई भोपळे आणि सचिव भीमराव गरकल यांच्यावर फौजदारी कारवाई करून अहवाल सादर करा. असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्याला दिल्याने या आदेशामुळे हिवरखेड सह संपूर्ण अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


हिवरखेड ग्रामपंचायत मधील काही वर्षांपूर्वीचे जवळपास अर्धा कोटी रुपयांची अफरातफर प्रकरणी अकोला जिल्हा परिषद च्या सीईओ नीं शपथपत्र दाखल न केल्याने, सुनावणीला हजर न झाल्याने आणि आरोपींची पाठराखण केल्याचे निदर्शनास आल्याने, उच्च न्यायालयाने सीईओंना दहा हजार रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला आहे. लक्षावधी रुपयांची अफरातफर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू होते.

तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सुरेश ओंकारे, रविंद्र वाकोडे, हिफाजत खा अयुब खा, अरुणाताई ओंकारे, वंदनाताई वानखडे, श्यामशील भोपळे, चंद्रकलाबाई मोरोकार यांनी तत्कालीन सरपंच शिल्पा भोपळे, ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांच्यावर १४ व्या वित्त आयोगाच्या निधी मधून मंजूर असलेल्या महिला तपासणी केंद्र, कोंडवाडा बांधकाम, शॉपिंग सेंटर, सार्वजनिक शौचालय, अंगणवाडी दुरुस्ती, पाणी टाकी बांधकाम, शाळा दुरुस्ती आणि तार कंपाऊंड, ग्राम भवन (पत्रकार भवन) इत्यादी मंजूर कामांमध्ये अफरातफर झाल्याची तक्रार केली होती.

याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी अहवालात ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल आणि शिल्पा भोपळे यांनी प्रत्येकी वीस लाख ८४ हजार १३३ असे एकूण ४१ लाख ८८ हजार २६६ रुपये इतक्या खर्चाबद्दल कोणत्याही प्रकारचे प्रमाणक उपलब्ध नसल्याने ही रक्कम वसूल पात्र असल्याचे दर्शविल्या गेले होते. परंतु, चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाल्यानंतरही गटविकास अधिकाऱ्यांनी शासन परिपत्रकानुसार कार्यवाही न केल्याने याप्रकरणी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा - धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

मुख्य कार्यकारी अधिकारी नव्हते हजर
न्यायमूर्ती शुक्रे आणि घरोटे यांच्या खंडपीठासमोर ता.१५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत सीईओ हजर झाले नाहीत. त्यांनी शपथ पत्र सुद्धा दाखल केले नाही. त्यामुळे कोर्टाने जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल आणि सरपंच शिल्पा भोपळे यांची पाठराखण केल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, पुढील सुनावणी ता.२३ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील राम कारोडे यांनी दिली.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com