
जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दुसऱ्या व अंतिम हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
अकोला : जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दुसऱ्या व अंतिम हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या निधीचे विभाजन करून निधी तहसीलदारांच्या निधी खात्यात वळती करण्यात आला आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमित सदर मदत निधीचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले नाही. त्यामुळे अद्यापही शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनसह, तूर, कपाशीला सुद्धा अति पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंड काळे पडले. झाडांची पडझड, बगीचातील फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा चांगलेच नुकसान झाले.
हेही वाचा - सीरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू
त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. परिणामी जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान मदत निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच मिळाले. त्याचे विभाजन करून निधी तहसीदारांच्या खात्यात वळती करण्यात आला आहे. परंतु शेतकरी मात्र अद्यापही मदतीपासून वंचितच आहेत.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
तालुकानिहाय वाटप करण्यात आलेला निधी
तालुका वितरीत निधी
अकोला ५ कोटी ६६ लाख ३ हजार
बार्शीटाकळी १ कोटी ४२ लाख ९५ हजार
अकोट ५ कोटी १८ लाख २२ हजार
तेल्हारा ३ कोटी १८ लाख ७ हजार
बाळापूर ६ कोटी २९ लाख ६९ हजार
पातूर १ कोटी ६० लाख ३५ हजार
मूर्तिजापूर २ कोटी ४३ लाख ४१ हजार
एकूण २५ कोटी ७८ लाख ७२ हजार
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -