esakal | कोरोनाची भीती कायम, आणखी एकाचा मृत्यू; ३७ नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Fear of corona persists, death of another; 37 new patients

 कोरोनामुळे गुरुवारी (ता. २१) एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासोबतच ३७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३३० झाली आहे.

कोरोनाची भीती कायम, आणखी एकाचा मृत्यू; ३७ नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोनामुळे गुरुवारी (ता. २१) एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासोबतच ३७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३३० झाली आहे.


कोरोना संसर्ग तपासणीचे जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) ३०७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २७० अहवाल निगेटिव्ह तर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला. संबंधित रुग्ण लक्ष्मी नगर, खदान, अकोला येथील ६६ वर्षीय महिला होती. तिला १४ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

याव्यतिरीक्त सकाळी सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ज्योती नगर येथील चार, डाबकी रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, तुकाराम चौक, मोठी उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन उर्वरित हिंगणा फाटा, सिंधी कॅम्प, वाशिम रोड, खानापूर, मलकापूर, आसेगाव बाजार, जठारपेठ, बाळापूर, आदर्श कॉलनी, राम नगर, मलकापूर रोड, जुने शहर, शिवणी व कौलखेड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूर येथील तीन तर उर्वरित आदर्श कॉलनी, केशव नगर, एरंडा व कृषी नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे.

हेही वाचा - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा

३६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, हॉटेल स्कायलार्क येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशन येथून १० अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ११२७९
- मृत - ३३०
- डिस्चार्ज - १०३३६
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६१३

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

 

loading image