esakal | अखेर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Finally, the 7th pay commission will be implemented for non-teaching staff in the Agricultural University

 राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून, त्या संदर्भात १६ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

अखेर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून, त्या संदर्भात १६ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी २६ ऑक्टोबर २०२० पासून विविध टप्प्यात आंदोलन पुकारले होते. आंदोलनादरम्यान चारही कृषी विद्यापीठातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भूसे, खासदार सुप्रिया सुळे यांना भेटले होते.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

या दरम्यान लवकर सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात कृषिमंत्र्यांकडून आश्‍वासनही देण्यात आले होते. अखेर १६ फेब्रुवारी २०२१ च्या शासन आदेशानुसार कृषी विद्यापीठे, सलग्न कृषी महाविद्यालये/विद्यालये आणि ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा व अमरावती मधील शिक्षकेत्तर संवर्गांना सोबतच्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे.

हेही वाचा - धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्‍चिती करण्यासाठी आवश्‍यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत देण्यात येणार असून, एकदा दिलेला विकल्प अंतिम राहणार आहे. निर्गमित आदेशान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येतो, त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येणार असून, त्या खालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

loading image