दारूच हवी होती, मग त्यांनी चक्क बारच फोडला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग बॉटल असा एकूण एक लाख ६२ हजार ६२६ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता.

बाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग बॉटल असा एकूण एक लाख ६२ हजार ६२६ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता.

सिमंत तायडे यांचे तक्रारीवरुन जुने शहर येथे या प्रकरणी २१ जानेवारीला गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने समांतर तपास करीत रविवार, ता. २४ जानेवारी २०२१ रोजी सराईत गुन्हेगार नामे हसन उर्फ इम्मी छटू निमसुरवाले (वय ३८) आणि त्याचा साथीदार चांद तुकड्या चौधरी ( वय ४०) दोन्ही रा. गवळीपुरा, कारंजा यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १७ विदेशी दारुचे बॉक्सचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन झायलो (क्र. एमएच ३७ ए ३२६६) जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

आरोपी हसन उर्फ इम्मी छट्टु निमसुरवाले, चांद तुकड्या चौधरी, अकिल कासम गारवे, छट्टू पटेल (रा. भुसावळ) यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा -शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर

आरोपी अकिल कासम गारवे याचे ताब्यातून त्याचे हिश्श्यावर आलेली रक्कम १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे आदेशाने स्थागुशा पथक पोउपनि सागर हटवार, सदाशिव सुळकर, मोहम्मद रफी, अब्दुल माजिद, रवी इरच्छे, एजाज अहमद, रोशन पटले, चालक पोकॉ अनिल राठोड, प्रवीण कश्यप, अविनाश मावळे यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Foreign liquor thieves arrested for breaking the bar