ऐन निवडणूकीत ग्रामपंचायत ऐवजी थेट नगरपंचायतची निवडणूकीचा प्रस्ताव पोहचला मंत्रालयात

Akola Marathi News Gram Panchayat Election Act Proposal for direct election of Nagar Panchayat instead of Gram Panchayat has reached the Ministry
Akola Marathi News Gram Panchayat Election Act Proposal for direct election of Nagar Panchayat instead of Gram Panchayat has reached the Ministry

हिवरखेड (जि.अकोला) : हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव अखेर नगर विकास मंत्रालयात पोहोचला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत ऐवजी थेट नगरपंचायतची निवडणुक घेण्यात यावी, अशी जनभावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहे.


आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्याचा प्रश्न उचलून धरला होता. त्यानुसार अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयात पोहोचला आहे. आता शासनाच्या अधिसूचनेकडे जनतेचे लक्ष लागले आहे. हिवरखेड येथील लोकसंख्या ४० हजारांवर आहे. येथे १८ हजारांवर मतदार आहेत.

 

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

हिवरखेड ही विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मागील २० वर्षांपासून हिवरखेडच्या नागरिकांचा नगरपंचायतसाठी सामूहिक संघर्ष सुरू आहे. सर्व प्रकारच्या त्रुटीपूर्तता करून सुधारित प्रस्ताव जिल्हा परिषदेतर्फे सीईओ सौरभ कटियार यांनी तत्काळ त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही वेळ न दडवता हा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयात रवाना केला. हिवरखेड ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली आणि काही दिवसातच नगरपंचायतचा निर्णय झाला तर ग्रामपंचायत निवडणूक फक्त औपचारिक मात्र ठरणार आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

अधिकारी, पदाधिकाऱ्यांची तत्परता
आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सीईओ सौरभ कटियार, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डिप्टी सीईओ राहुल शेळके, न. पा. प्रशासन अधिकारी टवलारे, शशिकांत देशपांडे, तहसीलदार राजेश गुरव, नायब तहसीलदार विजय सुरळकर, गिल्ले, गटविकास अधिकारी भरत चव्हाण, प्रशासक आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सरोदे, ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल, तत्कालीन सरपंच अरुणाताई ओंकारे आणि सर्व ग्रा. प.सदस्य, सर्व कर्मचारी बांधव, मंडळ अधिकारी झाडोकार, हिवरखेडचे तलाठी देशमुख, राठोड, मावळे, प्रत्येक ग्रामसभांमध्ये उपस्थित असणारे जागरूक आणि सक्रिय गावकरी यांच्यामुळे नगरपंचायतच्या प्रस्तावाला बळ मिळाले आहे.

हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

विधिमंडळाच्या पावसाळी व हिवाळी अधिवेशनात हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषद अथवा नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्याची मागणी केली. राज्य सरकारने सुद्धा लोकसंख्येच्या तुलनेत हिवरखेड नगरपंचायत बाबत सकारात्मकता दाखवली असून, सीईओ व जिल्हाधिकारी साहेबांनी तसा अहवाल मंत्रालयामध्ये वर्ग केला आहे. मी त्याचा पाठपुरावा करत असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल.
- अमोल मिटकरी, आमदार

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com