ग्रामपंचायत निवडणूक, सरपंचपदाची आरक्षण सोडत १ फेब्रुवारीला

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 22 January 2021

जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत १ फेब्रुवारी रोजी तालुका स्तरावर काढण्यात येणार आहे. त्यानंतर ३ फेब्रवारी रोजी जिल्हा स्तरावर महिलासाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येईल.

अकोला :  जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत १ फेब्रुवारी रोजी तालुका स्तरावर काढण्यात येणार आहे. त्यानंतर ३ फेब्रवारी रोजी जिल्हा स्तरावर महिलासाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येईल.

सन् २०२० ते २०२५ दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. परंतु ग्रामविकास विभागाच्या १६ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये ज्या जिल्ह्यांमध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे.

हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

सदर प्रक्रिया रद्द करुन नव्याने घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी यापूर्वी निश्चित केलेले आरक्षण रद्द करुन सन् २०२० ते २०२५ दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील स्तरावर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींकरीता सरपंचाची पदे आरक्षित करण्यात येतील. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बजावले आहेत.

हेही वाचा - सीरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू

स्त्री प्रवर्गाचे आरक्षण ३ फेब्रुवारीरोजी
तालुका स्तरावर आरक्षित प्रवर्गाचे आरक्षण काढल्यानंतर अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि खुल्या वर्गातील स्त्रीयांकरिता आरक्षणाची सोडत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सदर प्रक्रिया पार पडेल.

हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

प्रवर्गनिहाय असे असेल आरक्षण
तालुका ग्रा.पं. एससी एसटी नामाप्र सर्वसाधारण
तेल्हारा ६२ १४ ०६ १७ २५
अकोट ८४ १६ १२ २३ ३३
मूर्तिजापूर ८६ २२ ०३ २३ ३८
अकोला ९७ २८ ०८ २६ ३५
बाळापूर ६६ २१ ०२ १८ २५
बार्शीटाकळी ८० १२ ०६ २२ ४०
पातूर ५७ १२ ०८ १५ २२
एकूण ५३२ १२५ ४५ १४४ २१८

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Gram Panchayat elections, leaving the post of Sarpanch on February 1