esakal | ग्रामपंचायत निवडणुकीत वाहताहेत दारूचे पाट, जप्त केला लाखोंचा मुद्देमाल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Liquor streams flowing in Gram Panchayat elections, millions of rupees confiscated

 जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. निवडणुकीत प्रचाराची मुदत १३ जानेवारीपर्यंत असल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये प्रचाराची धामधूम वाढणार असून उमेदवार मतदारांना आकर्षिक करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत वाहताहेत दारूचे पाट, जप्त केला लाखोंचा मुद्देमाल

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. निवडणुकीत प्रचाराची मुदत १३ जानेवारीपर्यंत असल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये प्रचाराची धामधूम वाढणार असून उमेदवार मतदारांना आकर्षिक करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

गाव पातळीवर अतिशय प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मतदारांना प्रलोभण दाखवण्यासाठी दारूचा उपयोग सुद्धा होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्रामीण भागात कारवाईचा धडाका लावला आहे. विभागाने आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ६९ दारूच्या केसेस सुद्धा दाखल केल्या आहेत.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण थंडीतही तापायला सुरुवात झाली आहे. जसजसे निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत, तसतसा गावागावांत निवडणुकीचा रंग चढणार आहे. निवडणुकीचा रंग अधिक वाढावा व आपल्या पॅनल किंवा उमेदवारालाच अधिक मत मिळावे यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत.

हेही वाचा - पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार

त्यासाठी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी विविध प्रकारचे प्रलोभण सुद्धा दाखवण्यात येत आहेत. या निवडणुकीत मतदारांना आकर्षिक करण्यासाठी दारूचा उपयोग मोठ्‍या प्रमाणात होऊ शकतो, ही बाब लक्षात घेवून पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्रामीण भागातील हातभट्‍टी व अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीत दारूचे पाट वाहत असले तरी त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई करून निवडणुकीत दारूचा उपयोग कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

ग्रामीण भागात ६९ वर कारवाया
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ११ डिसेंबर २०२० रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाली. सदर तारखेपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात आतापर्यंत ६९ छापेमार कारवाया केल्या. त्यामधील ४२ प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात विभागाला यश मिळाले, तर २७ प्रकरणांमध्ये बेवारस कारवाया करण्यात आल्या. छापेमारीत ४२ आरोपींना अटक करण्यात यश सुद्धा मिळाले असून सदर कारवायातून ३ लाख ८१ हाजर १७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

१३ हातभट्‍टी केंद्रांवर गुन्हे दाखल
ग्रामपंचायत निवडणुकीचा रंग बेरंग करण्यासाठी दारूचा उपयोग होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत १३ हातभट्‍टीच्या केंद्रांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. याकारवाईतून २२५ लीटर मोहा सडवा नष्ट करण्यात आला असून चार सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - ना दुरुस्ती, ना आंदोलन, ना कारवाई, पाणी मुरले कुठे?

ग्रामपंचायत निवडणुकीत दारूच्या उपयोगावर आळा बसावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन पथक तैनात केले आहेत. संंबंधित पथक ग्रामीण भागात दररोज कारवाया करत आहेत. त्यामध्ये निरीक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पथकांनी आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना अटक सुद्धा केली आहे.
- स्नेहा सराफ, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

loading image