esakal | नव्या स्ट्रेंथचे रहस्य कायम; इंग्लंड रिटर्नच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Mystery of New Strength Remains; Five of the contacts in the England return were positive

इंग्लंडमधून अकोल्यात आलेल्या दोन जणांचे वैद्यकीय अहवाल नागपूरात कोरोना पाॅझिटिव्ह आल्याचा प्रकार दोन-तीन दिवसांपूर्वी समोर आला होता. संबंधितांच्या संपर्कातील त्यांचे स्थानिक रहिवाशी पाच जण नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.

नव्या स्ट्रेंथचे रहस्य कायम; इंग्लंड रिटर्नच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : इंग्लंडमधून अकोल्यात आलेल्या दोन जणांचे वैद्यकीय अहवाल नागपूरात कोरोना पाॅझिटिव्ह आल्याचा प्रकार दोन-तीन दिवसांपूर्वी समोर आला होता. संबंधितांच्या संपर्कातील त्यांचे स्थानिक रहिवाशी पाच जण नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग व प्रशासनाची चिंता वाढली असून संबंधितांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्थची लागण झाली आहे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर संबंधितांची पुढील वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच समोर येईल.

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता या इंग्लंडमध्ये नवीन प्रजातीचा कोरोना निर्माण झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. सध्याच्या या परिस्थितीत जो जुना कोरोना अस्तित्वात होता त्याच्यामुळे लाखो नागरिक या संसर्गजन्य आजाराने बाधित झाले तर हजारो नागरिकांचा मृत्यू झाला, परंतु आता कोरोना नवा अवतार समोर आला असून तो जुन्या पेक्षा अधिक घातक व वेगाने प्रसारित होत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

नव्या कोरोनाचे रुग्ण सध्या इंग्लंडमध्येच आढळत आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक परत मायदेशी येत आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात इंग्लंड येथून आलेल्या नागरिकांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान इंग्लंड येथून अकोला येथे आलेले दोन जण १३ ते १६ डिसेंबर दरम्यान महानगरात वास्तव्यास होते. त्यानंतर संबंधित नागपूरला गेले व त्याठिकाणी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. संबंधितांच्या संपर्कातील स्थानिक रहिवाशी सहा नातेवाईकांची कोरोना संसर्ग तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढली असून आरोग्य व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

तूर्तास नव्या स्ट्रेन्थची तपासणी नाही
इंग्लंडहून परतलेले दोन जण अकोल्यातून नागपूर येथे गेल्यानंतर तेथे ते कोरोना पॉझिटिव्ह आले. परंतु संंबंधितांना नव्या स्ट्रेन्थच्या कोरोनाची लागण झाली आहे अथवा नाही हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सदर प्रयोगशाळेचा अहवाल नव्या स्टेंथच्या कोरोनाचा असल्याचे निष्पन्न झाल्यास अकोल्यात पॉझिटिव्ह आलेल्या पाच जणांचे अहवालही पुढील तपासणीसाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

इंग्लंड रिटर्नची संख्या पोहोचली पंधरावर
इंग्लंड येथून अकोला जिल्ह्यात सुरूवातीला ८ प्रवाशी परतल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली होती. परंतु त्यामध्ये आता वाढ झाली असून इंग्लंड रिटर्न प्रवाशांची संख्या पंधरा झाली आहे. संबंधित सर्व प्रवाशांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image