Gram Panchayat Result :नवा गडी नवा राज, मूर्तिजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तरूणांना संधी

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 19 January 2021

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतसाठी ता.१५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. सोमवारी मतमोजणी शांततेत पार पडली. यावेळी तालुक्यातील मतदारांनी प्रस्तापितांना नाकारत नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून आले. नवा गडी नवा राज या प्रमाणे तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये बदल झालेला दिसून येणार आहे.
 

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतसाठी ता.१५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. सोमवारी मतमोजणी शांततेत पार पडली. यावेळी तालुक्यातील मतदारांनी प्रस्तापितांना नाकारत नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून आले. नवा गडी नवा राज या प्रमाणे तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये बदल झालेला दिसून येणार आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतसाठी १०७ मतदान केंद्रावर २३५ सदस्यांसाठी ५३४ उमेदवार रिंगणात होते. ३४ हजार ७०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेलया कुरूम, हातगाव व सिरसो ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्तापितांना मोठे धक्के बसले.

हेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन!

कुरूम येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. पंचायत समिती उपसभापती व माजी सरपंच उमेश मडगे यांचा पराभवसुद्धा धक्कादायक ठरला.

बाबू देशमुख व सुरेश मालाणी यांच्या भाजप- वंचित बहुजन आघाडी समर्थीत परिवर्तन पॅनलने १५ पैकी १३ जागांवर बाजी मारून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. १३ सदस्य संख्या असलेल्या सिरसो येथे माजी सरपंच जयश्री सुरेंद्र मेहरे यांच्यासह त्यांच्या गटालाही पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा - आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल

हातगाव ग्रामपंचायतमध्ये १३ नवयुवक पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले मात्र सत्ता मिळविता आली नाही. भटोरी ग्रामपंचायतमध्ये सतत तिसरांदा डॉ. अमित कावरे यांच्या जनहित विकास पॅनेलने विजय मिळविला.

हेही वाचा - धक्कादायक! मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला

त्यांचे ९ पैकी ५ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी महिला ओबीसी आघाडीच्या सुषमा कावरे व पंचायत समिती माजी उपसभापती विनायकराव कावरे यांचा मुलगा शेखर कावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हिरपूर येथे सुरेश वऱ्हेकर यांच्या नेतृत्वाखाली ११ पैकी ११ उमेदवार निवडून आले.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Opportunity for youth in Gram Panchayat elections in Murtijapur taluka