निवडणूकीचा नवा फंडा, मनधरणी आणि विनवणीची कसरत सुरू

Akola Marathi News The picture of Gram Panchayat elections will be clear today; Last day to withdraw application
Akola Marathi News The picture of Gram Panchayat elections will be clear today; Last day to withdraw application

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. संबंधित ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (ता. ४) दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक निवडणूक रिंगणातून माघात घेवू शकतात.

त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये अपक्ष, बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांची मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कसरत होत आहे. मते खाणाऱ्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी मनधरणी व विनवणीचे प्रकार ग्रामीण भागात होत असल्याचे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींपैकी २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६ हजार १३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. संबंधित अर्जांची गुरुवारी (ता. ३१ डिसेंबर) छाननी केली असता ७७ उमेदवारांचे ९८ अर्ज अवैध जाहीर करण्यात आले. त्यासोबतच ५ हजार ९६९ उमेदवारांचे ६ हजार ५३ अर्ज वैध जाहीर करण्यात आले. दरम्यान निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा सोमवार (ता. ४) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत.

अनेकजण नॉटरिचेबल
मत खाणाऱ्यांना निवडणूक रिंगणातून माघार घेता यावी यासाठी विनवणी, मनधरणीचे प्रयत्न सुरू असतानाच अनेकांनी त्यांचे मोबाईल बंद करुन ठेवल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे संबधितांना त्यांच्या घरी, शेतात व त्यांच्या मित्र परिवाराकडे जावून त्यांचा शोध घ्यावा लागत आहे. तरीही उपयोग न होत नसल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.

विविध क्लृप्त्यांचा वापर
निवडणूक रिगंणातून माघारीसाठी अनेकांची मनधरणी करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविण्यात जात आहेत. राजकीय दबाव टाकल्या जात आहे. नातेगोत्याचा आसरा घेण्यात येत आहे. कामे करून देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. त्यासह इतर आमिष सुद्धा दाखवले जात आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत गोड-गोड बोलून वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
गावपातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या काही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिकांसह तालुका व जिल्हास्तरावरील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. यात कोण कुणाची कुरघोडी कशी करतो, हे निकालानंतरच समजणार आहे.

आजच चिन्हांचे वाटप
निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत ४ जानेवारीरोजीच दुपारनंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या निश्चित होईल. संबंधित उमेदवारांना त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचाराचा धुराळा उडेल.

अशी आहे अर्जांची स्थिती व उमेदवार
तालुका ग्रा.पं. वैध अर्ज उमेदवार
तेल्हारा ३४ ८२२ ८२२
अकोट ३८ ९२२ ८९५
मूर्तिजापूर २९ ६७७ ६७७
अकोला ३६ ११२३ १०८७
बाळापूर ३७ १०४८ १०४७
बार्शीटाकळी २७ ७३३ ७१६
पातूर २३ ७२८ ७२५
एकूण २२४ ६०५३ ५९६९

(संपादन - विेवेक मेतकर)

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com