रामायण, महाभारत काळातही होत्या समृध्द ग्रामपंचायती!

Akola Marathi News Ramayana, there were prosperous gram panchayats even during the Mahabharata period
Akola Marathi News Ramayana, there were prosperous gram panchayats even during the Mahabharata period

अकोला: महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय. तुमच्याबी गावातलं वातावरण सध्या तापलं असेल. बैठका, चर्चा यांनी जोर धरला असेल. पण, ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्वी कशी होती, याचीच माहिती आता आपण पाहणार आहे.

विविध राजे, तत्कालिन संस्कृती, एकमेकांसोबतचे राजकारण, समाज, आचार विचार ह्यांचा समग्र समूह म्हणजे रामायण. भारतीय संस्कृती त्यातून पुरेपूर दिसते त्यामुळे रामायण हे वेदकालीन संस्कृती वा इ स पूर्व संस्कृती मधील फार मोठा मैलाचा दगड ठरते. बाल, अयोध्या, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड हे ते सात कांड आहेत.

वैश्विक साहित्याचे एक मोठे दालन ‘काव्य’ या साहित्य प्रकाराने व्यापले आहे. भारतात प्राचीन वैदिक काळापासून सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या कवींनी रचलेली महाकाव्ये हे केवळ भारताचे वाङ्मयीन वैभव नाही, तर ते वैश्विक महाकाव्यांचे सौंदर्यदर्शन आहे. ही महाकाव्ये आणि ती रचणारे महाकवी म्हणजे भारतीय साहित्यसृष्टीने विश्वाला दिलेली एक अक्षर देणगी आहे.

इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असत

आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून राहिलेला आहे. 

खरं तर, प्राचीन कालखंडापासून भारतात स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत प्राचीन काळामध्ये गावाचा कारभार पंचायत मार्फत होत असे. वेदिक काळामध्ये गावचा कारभार ग्रामसभा पाहत असे व अश्या ग्रामसभेची निवड जनतेमार्फत केली जाते. तसेच गावच्या प्रमुखाला ग्रामिणी या नावाने संबोधले जायचे. तसेच रामायण व महाभारतामध्ये गावसभा व जनपद या शब्दांचा उल्लेख आढळून येतो. रामायण, महाभारत काळातील गावांचा विचार करता जनपद या प्रशासन व्यवस्था समृध्द असल्याची जाणवते. 


मात्र, आता काळानुसार परिस्थिती बदलली आहे. आता छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते आहे.. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जात असल्याने भारतीय पंचायत राज व्यवस्थेचे हे यश मानल्या जातं. 


(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com