धान्य वाटप केल्यानंतरही रेशन दुकानदारांचे कमिशनसाठी हेलपाटे

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 5 January 2021

गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपयांचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले होते. सदर धान्याचे वाटप केल्यानंतर सुद्धा दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा करावी लागत आहे.

अकोला : गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपयांचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले होते. सदर धान्याचे वाटप केल्यानंतर सुद्धा दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा करावी लागत आहे.

कमिशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी आहे, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी दिली आहे.

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्यात आले.

त्यानंतर सदर योजनेला शासनाने नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यासह पाच किलो तांदुळा येवजी लाभार्थ्याना तीन किलो मोफत गहू व दोन किलो मोफत तांदुळ देण्याचे जाहीर केले. सदर धान्याचे वाटप मोफत होत असल्याने केंद्राकडून आलेल्या अतिरिक्त तांदुळाच्या बदल्यात रेशन दुकानदारांना कमिशन मिळावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांनी केली होती.

ही मागणी शासनाने मंजुर केली होती व रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल मागे १५० रुपये कमिशन जाहीर केले होते. परंतु रेशन दुकानदारांनी धान्य वितरण केल्यानंतर सुद्धा त्यांना कमिशनसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

केशरी कार्डधारक रेशनविना
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीत एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य सवलतीच्या दरात देण्यात आले. परंतु ऑगस्ट महिन्याचे धान्य देण्यास शासनाने हात अखडता घेतला होता. सदर धान्य अद्याप रेशन कार्डधारकांना मिळाले नाही. त्यामुळे संबंधित कार्डधारक रेशन दुकानांमध्ये जावून दुकानदारांसोबत वाद घालत असल्याचे प्रकार सुद्धा होत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

वातावरणात बदललय, आर्द्रतेचाही वाढला टक्का

उमेदवार मुख्यध्यापकांना देत आहेत धमकी - विनोद नरवाडे 

तण नाशक फवारणी केल्यामुळे गहू करपला

शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Ration shopkeepers help for commission even after distribution of grain