
तालुक्यातील एका महिला शिक्षिकेचा पाठलाग करून तिला त्रास देत धमकी देणारा नराधम शिक्षकाच्या विरोधात हिवरखेड पोलिसात ता. २६ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील एका महिला शिक्षिकेचा पाठलाग करून तिला त्रास देत धमकी देणारा नराधम शिक्षकाच्या विरोधात हिवरखेड पोलिसात ता. २६ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर हा शिक्षक फरार झाला असल्याने हिवरखेड पोलिस या शिक्षकाच्या तपासाकरिता पातुरला जाऊन आलेत. मात्र एवढे दिवस उलटून सुद्धा हिवरखेड पोलिसांना आरोपीस अटक करता न आल्याने पोलिसांचा सुस्तपणा समोर आला आहे.
पातूर तालुक्यातील सावरगाव येथील एका खासगी संस्थेवर शिक्षक असलेला अनिल आयस्कारने तेल्हारा तालुक्यातील एका महिला शिक्षिकेचा पंचायत समिती तेल्हारा, जिल्हा परिषद अकोला, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, प्रा. शिक्षणाधिकारी कार्यालय अकोला तसेच आयुक्त कार्यालयात निनावी नावाने खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर शिक्षक आघाडी अकोला या व्हॉटस ग्रुपवर इतरांमार्फत बदनामी कारक पोस्ट टाकल्या आहेत.
कोणत्या न कोणत्या कारणावरून पाठलाग करायचा. या सोबतच तिला धमकीसुध्दा देत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिला शिक्षिकेने हिवरखेड पोलिस स्टेशनला शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून अनिल आयस्कार या शिक्षकाच्या विरोधात ३५४ (ड), ५०६, ५०० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल आयस्कार हा शिक्षक फरार आहे. या शिक्षकाच्या शोधात हिवरखेड पोलिस पातूर येथे जाऊन आलेत. या शिक्षकाचा कसून शोध घेतल्या जात आहे. अनिल आयस्कार हा गेल्या काही वर्षांपासून एका माजी आमदाराच्या जवळचा असल्याचे भासवत होता व स्वतःला शिक्षक नेता समजत होता.
परंतू आयस्कार याच्या या अश्लील कृत्यामुळे शिक्षकाची प्रतीमा मलीन झाली आहे. आठ दिवस उलटून सुद्धा आरोपीच्या मुसक्या आवळण्यास हिवरखेड पोलिसांना यश आले नसल्याने हिवरखेड पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये उलट ससुलट चर्चांना उधाण आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -
रामायण, महाभारत काळातही होत्या समृध्द ग्रामपंचायती!
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या भेटीने गहिवरले शहीदांचे कुटुंबीय
उमेदवार मुख्यध्यापकांना देत आहेत धमकी
शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री