esakal | शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अवैध सावकारीची पाळेमुळे छाटणार- गुलाबराव गावंडे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News will be cut off due to illegal moneylenders robbing farmers - Gulabrao Gawande

शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या अवैध सावकारांचे कारनामे पुन्हा एकदा सुरू झाले असून, या अवैध सावकारीचे पाश पूर्वीपेक्षाही जास्त तीव्र प्रमाणात शेतकऱ्यांभोवती आवळायला लागले आहेत. विशेष म्हणजे आता या अवैध सावकारीला यंत्रणेतील काही लोकांचे सुद्धा सहकार्य मिळत असल्याने अवैध सावकारीचे हे नवे रूप पूर्वीपेक्षाही भयंकर आहे.

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अवैध सावकारीची पाळेमुळे छाटणार- गुलाबराव गावंडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या अवैध सावकारांचे कारनामे पुन्हा एकदा सुरू झाले असून, या अवैध सावकारीचे पाश पूर्वीपेक्षाही जास्त तीव्र प्रमाणात शेतकऱ्यांभोवती आवळायला लागले आहेत. विशेष म्हणजे आता या अवैध सावकारीला यंत्रणेतील काही लोकांचे सुद्धा सहकार्य मिळत असल्याने अवैध सावकारीचे हे नवे रूप पूर्वीपेक्षाही भयंकर आहे.

त्यामुळे या अवैध सावकारी विरुद्ध पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी रविवारी (ता.३) पत्रकार परिषदेत सांगितले.


गेल्या काही वर्षांपूर्वी अवैध सावकारांच्या लुबाडणूकीला वैतागून अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जीवनयात्रा संपविल्या होत्या. अवघ्या काही रकमेच्या मोबदल्यात अवैध सावकारांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच दागिने व इतर संपत्ती हडपली होती. या अवैध सावकारांच्या कचाट्यात अडकून अनेक शेतकरी कुटुंबे उद्‍ध्वस्त झाली होती.

तेव्हा आपण या अवैध सावकारीच्या विरोधात आवाज उठवून मोठे आंदोलन छेडले होते. विविध आंदोलने करून या अवैध सावकारीचे प्रकरण विधिमंडळापर्यंत पोहोचविले. विधिमंडळात सुद्धा या विरोधात आवाज उठवून या अवैध सावकारांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न करून सरकारला कायदा करण्यास भाग पाडले. त्यामुळे अखेर आपल्या प्रयत्नांना यश येऊन अवैध सावकार विरोधी कायदा अस्तित्वात आला, अशी माहिती मा. गुलाबरावजी गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाला माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु या निर्णयातील काही बंधनांमुळे काही शेतकरी या निर्णयाच्या फायद्यापासून वंचित राहिले. आता शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी अवैध सावकारीचे नवे रूप उदयाला आले असून, अवैध सावकारांना प्रशासकीय यंत्रणेतील काही लोकांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे अवैध सावकारी प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळणे दूरच, उलट न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना धमक्या मिळायला लागल्या आहेत.

परिणामी शेतकरी पुन्हा एकदा हतबल झालेले असून शेतकऱ्यांना अवैध सावकारी व या अवैध सावकारीशी हात मिळवणी व मिलीभगत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील शक्तींविरोधात कुणाचा तरी आधार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेत असून, आता पुन्हा एकदा अवैध सावकारी विरोधात आपण मैदानात उतरणार असल्याचे गुलाबराव गावंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला शेतकरी रमेश पाटील खिरकर, बाळासाहेब भाबट, मनोहरराव नवलकर, नरेंद्र शर्मा, ॲड. भिसे यांची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -

पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची

loading image