esakal | वाशीम शहराच्या विकासासाठी १२० कोटी रुपयाचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News 120 crore fund for the development of Washim city

शहरातील रस्त्यांची अवस्था अनेक वर्षांपासून बिकट झाली होती. अनेक वेळा रस्ते होवूनही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून वाशीम शहरातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या मार्फत १२० रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. वाशीम शहरातील विकास कामांना प्रारंभ होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वाशीम शहराच्या विकासासाठी १२० कोटी रुपयाचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम  : शहरातील रस्त्यांची अवस्था अनेक वर्षांपासून बिकट झाली होती. अनेक वेळा रस्ते होवूनही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून वाशीम शहरातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या मार्फत १२० रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. वाशीम शहरातील विकास कामांना प्रारंभ होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कामांमध्ये धार्मिक व सामाजिक विकास कामे होणार असून सर्व समाजांना या विकास कामांच्या निधीत खा. भावनाताई गवळी पाटील यांनी प्राधान्य दिले आहे. सामाजिक सभागृह, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक, डोमशेड आदी कामांचा समावेश आहे. रस्ते विकासासाठी वाशीम नगर परिषदेला ६० कोटी व इतर वैशिष्टपूर्ण कामांसाठी ठोक तरतूद म्हणून ६० कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. शासनाच्या नगर परिषद वैशिष्टये पूर्ण कामासाठी पाठपुरावा करून खा. भावनाताई गवळी यांच्या पुढाकाराने शहरातील विविध कामांसाठी ६० कोटी रूपये मंजूर करून आणण्यात आले आहे.

रस्ते कामासाठी ६० कोटी रूपये आले आहे. राज्यातील विशेष रस्ता अनुदान अंतर्गत् शहरात ५० कोटी रुपयांचे रस्ते होणार आहे. या कामांमधून शहरातील प्रत्येक भागात रस्ते होणार आहेत. शहराच्या विविध कामांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी आणला असून, त्यामध्ये सर्वसमावेशक कामांना प्राधान्य दिले आहे. तर सर्व समाजाच्या सामाजिक कामेही या निधीतून होणार आहे. त्यामुळे सर्व समाजांना समान निधीचा वाटप करण्यात आला आहे.


सावतामाळी मंदिरासमोर सभागृह बांधकाम, पत्रकार भवनाचे बांधकाम, जुन्या बालाजी मंदिराच्या शेडचे बांधकाम, बेलदार पुरा येथील शादीखान्याचे बांधकाम, शिवाल्य शिवमंदिराच्या सभागृहाचे बांधकाम, गजु भांदुर्गे घरासमोरील शेडचे बांधकाम, मन्नासिंह चौकातील हनुमान मंदिराच्या सभागृहाच्या बांधकाम, चामुंडा देवी मंदिरासमोर शेडचे बांधकाम, गुरुनानक मार्केट दोन्ही बाजुने गेट उभज्ञरणे, चिंतामणी मठा समोरील सभागृह बांधकाम, सेना महाराज शुक्रवारपेठ सभागृह बांधकाम, महाकाली मंदिरासमोरील सभागृहाचे उर्वरीत बांधकाम, विश्वकर्मा मंदिरासमोरील गव्हाणकर नगर येथील सभागृहाचे बांधकाम, विधे वासनिक देवी वाल्मीकनगर सभागृहाचे बांधकाम, नागनाथ मंदिर सुदर्शन नगर समोरील सभागृहाचे बांधकाम, मिर्झा कब्रस्थान येथे शेडचे बांधकाम असे सामाजिक व धार्मिक विकास कामे होणार आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

 

 

 

 

 

loading image