esakal | उद्या पुन्हा घंटानाद, आघाडी सरकार हिंदू विरोधी, मंदीरांसाठी भाजपचे पुन्हा आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Bell ringing again tomorrow, alliance government is anti-Hindu, BJPs agitation for temples again

केंद्र सरकारने मंदिर देशभरात सुरू केलेत असताना केवळ आपण सर्वापेक्षा वेगळे असल्याचा दाखवण्याच्या दृष्टीने व काँग्रेसच्या  सोनिया गांधी राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिरे सुरू करत नाही.

उद्या पुन्हा घंटानाद, आघाडी सरकार हिंदू विरोधी, मंदीरांसाठी भाजपचे पुन्हा आंदोलन

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला:  केंद्र सरकारने मंदिर देशभरात सुरू केलेत असताना केवळ आपण सर्वापेक्षा वेगळे असल्याचा दाखवण्याच्या दृष्टीने व काँग्रेसच्या  सोनिया गांधी राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिरे सुरू करत नाही.

या विरोधात भाजपा अध्यात्मक आघाडी व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी घंटा नाद आंदोलन केल्यानंतर आता स्थानिक राजराजेश्वर व अकोला शहराचे आराध्यदैवत यांच्या मंदिरासमोर 13 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन वाजता पर्यंत उपोषण करून प्रभू भोलेनाथ राजराजेश्वराला साकडे घालून या सरकारचा नाकर्तेपणा प्रार्थना करण्यात येणार आहे

काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी हे केवळ हिंदू धर्माच्या विरोधात आहे. या कृतीने सिद्ध होत असून मंदीर सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रतिज्ञापत्र लिहून भावना दुखण्याचा प्रकार करत आहे.  सर्व गोष्टी आपल्या मातोश्री'वर येऊन नतमस्तक होत असेल त्यांचाच प्रश्न निकाली काढण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे.

ईश्वराला बंदिस्त ठेवण्याचा प्रकार सहन केल्या जाणार नाही. यासाठी भाजपा आक्रमक होऊन साधुसंतांच्या व वारकरी समुद्राच्या सोबत असून त्यांच्या आंदोलनाला भाजपाचा सक्रिय पाठिंबा असल्याची माहिती महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली.

 यासेबोतच केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे, जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार  रणधीर सावरकर, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. 

यासाठी तालुका पदाधिकारी अध्यात्मक आघाडीचे पदाधिकारी संस्कृतीक आघाडीचे पदाधिकारी व विविध आघाडीचे कार्यकर्ते सक्रिय भाग घेणार असल्याचे माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे.