esakal | प्रवाशीच नाहीत तर एसटी करेल तरी काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Bus will not go to the village as there are no passengers!

संग्रामपूर तालुक्यातील मोठे गाव पातुर्डा बु. या गावाला बरीच खेडेपाडे लागलेले आहेत तर याच गावातून बाकीच्या गावांना प्रवास करावा लागतो;

प्रवाशीच नाहीत तर एसटी करेल तरी काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

पातुर्डा बु (जि.बुडाणा) ः संग्रामपूर तालुक्यातील मोठे गाव पातुर्डा बु. या गावाला बरीच खेडेपाडे लागलेले आहेत तर याच गावातून बाकीच्या गावांना प्रवास करावा लागतो; मात्र याच गावातील काही बसेस बंद असल्यामुळे गावकरी व इतर गावचे प्रवाशाना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.


मागील ४५ वर्षांपासूनच गावात बुलडाणा-पातुर्डा मुक्कामी बस, अकोला-पातुर्डा सकाळी ८.३० ला येणारी बस व जळगाव जामोद मुकामी बस, अकोट, तेल्हारा मुकामी बस असायच्या. या सर्व बसेस प्रवासी नाही हे कारण समोर करून एसटी महामंडळाने बंद केल्या आहेत. प्रवासी नाही म्हणून गावात बस जाणार नाही.

हेच का लालपरीचे ब्रीदवाक्य आता असे म्हणायची वेळ आली आहे. बुलडाणा-पातुर्डा आधी बुलडाणा आगारकडून सुरू होती. काही वर्षांपूर्वी शेगाव आगारने ती सुरू केली आहे .सकाळी पातुर्डा येथून ही बस ६ वाजता शेगावकरिता निघते. यामध्ये शाळकरी विद्यार्थी, भाजीपाला दुकानंदार, व इतर प्रवासी प्रवास करतात. शेगाववरून हीच बस सायंकाळी ७ वाजता निघते.

या वेळेवर बरीच नौकर वर्ग व इतर प्रवासी असतात. मात्र या बसेस बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे त्यांचा खासगी वाहनाकडे कल वाढला आहे. जळगाव जामोद-पातुर्डा बस बंद आहे. आगार प्रमुखाने विद्यार्थी नाही हे कारण पुढे करून ही बस बंद ठेवली. अकोट-पातुर्डा ही बस पण बंद आहे. या सर्व बसेस आगर प्रमुखच्या मनमानी कारभारामुळे बंद आहेत.


एसटी महामंडळाने सेवा भावना जपावी
शालेय फेऱ्याचे कारण सांगून जाळगाव जामोद बस फेरी बंद आहे तर शेगाव आगाराकडून चालणारी बुलडाणा-पातुर्डा ही इन्कम नाही म्हणूम बंद आहे. अकोला ते पातुर्डा चांगले उत्पन्न देणारी फेरी पण बंद आहे.

त्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहे. एसटी महामंडळाने सेवा भावनेला हरताळ फासत या फेऱ्या बंद केल्यामुळे नागरिक आर्थिकदृष्ट्या कमालीचे त्रस्त झाले आहेत. एसटी महामंडळने कमर्शियल न होता आपली सेवा भावना जपावी व आपले ब्रीदवाक्य कायम ठेवावे, अशी भावना जनसामान्यांमधून उमटत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)