
सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच व्हायरल झालाय. फेसबुकचा वापर करणाऱ्यांनीही या ट्रेंडला प्रतिसाद देत पती-पत्नीचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो टाकून एकमेकांना चॅलेंज दिले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या 'कपल चॅलेंज'ने भलताच धुमाकूळ घातलाय.
जनता कर्फ्यूचे झाले ‘कपल चॅलेंज’, पाच दिवसाचा कर्फ्यू एकाच दिवसात गुंडाळला
अकोला : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच व्हायरल झालाय. फेसबुकचा वापर करणाऱ्यांनीही या ट्रेंडला प्रतिसाद देत पती-पत्नीचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो टाकून एकमेकांना चॅलेंज दिले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या 'कपल चॅलेंज'ने भलताच धुमाकूळ घातलाय. आणि हो, जेवढा या चॅलेंजला प्रतिसाद मिळाला तेवढाच विरोधही झाला बरं का? असाच काहीसा प्रकार अकोल्यातील जनता कर्फ्यूसंदर्भात झाला. अकोला येथील विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या पुढाकाराने तसेच काही व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्यूची मागणी केली होती. मात्र असे असले तरी या जनता कर्फ्यूला जनतेनेच नाकारल्याचे पहिल्याच दिवशी बघावयास मिळाले. मोठे व्यावसायिक दुकाने व सराफा दुकाने वगळता सर्वच व्यवहार सुरू असल्याने जनता रस्त्यावर दिसून आली. शहराच्या सर्वच भागातील व्यवहार सुरळीत सुरू होते. ग्रामीण भागातील जनतेनेही जनता कर्फ्य् झिडकारल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे विदर्भ चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲड इंडिस्ट्रजने केलेले आवाहन आता मागे घेण्यात आले आहे. विविध संघटनांशी ऑनलाईन चर्चा झाल्यानंतर एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र असे असले तरी प्रशासनाच्या व्यतीरिक्त या जनता कर्फ्यूच्या पाठीशी अकोल्यात फारशे कुणी दिसले नाही.
शुक्रवारी मुख्य बाजारपेठ, मध्यवर्ती ठिकाणांवरी बहुतांश व्यवहार सुरू होते. एमआयडीसी परिसरातील कारखाने, ऑटाे-रिक्षा, बस, पानपट्टी, चहाची हाॅटेल्स, अनेक लहान-माेठी कापड व जनरल स्टाेअर्स सुरू होते. सकाळी जनता बाजारात फळांचा लिलावही झाला. काही ठिकाणी पाले भाज्यांचीही विक्री झाली. अनेक हाॅटेल्सवर खाद्य पदार्थ मिळत हाेती. मुख्य बाजारपेठ व मार्गांवर नागरिकांनी नेहमीसारखीच गर्दी केल्याचे दिसून अाले. शासकीय कार्यालयांमध्येही राेजसारखीच नागरिकांची वर्दळ हाेती.
तेल्हाऱ्यात जनतेने दाखविली केराची टोपली (संपादन - विवेक मेतकर) |
|||
Web Title: Akola News Couple Challenge Over Public Curfew Five Day Curfew Stopped One Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..