डीनच्या पतीसह दोघांचा मृत्यू; 80 नवे पॉझिटिव्ह, रुग्णवाढीचा वेग कायम

Akola News: Dean husband and two die; 80 new positive, patient growth rate maintained
Akola News: Dean husband and two die; 80 new positive, patient growth rate maintained

अकोला :  कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाचा जिल्ह्यात थैमान सुरूच आहे. कोरोनामुळे रविवारी (ता. २७) दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (डीन) डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये (वय ७१) यांचा झाला. दुसरा मृत्यू बोरगाव येथील एका महिलेचा झाला. याव्यतिरीक्त कोरोनाचे ८० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५३१ झाली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातलं आहे. महानगरानंतर कोरोनाचे रुग्ण आता गाव-खेड्यातही आढळत आहेत. दरम्यान कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. २७) ३८७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८० अहवाल पॉझिटिव्ह तर ३०७ अहवाल निगेटिव्ह आले.

याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये यांचा झाला. त्यांच्यावर स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. परंतु दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली.

डॉ. इंदुप्रकाश हे सामाजिक उत्तरदायित्व असलेले वैद्यकीय अधिकारी होते. राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी सेवा दिली. वयाच्या ५८ व्या वर्षी नागपूरच्या आयजीएमसीमधून ते सेवानिवृत्त झाले होते. दूसरा मृत्यू बोरगांव मंजू येथील ६५ वर्षीय महिलेचा झाला. ती २४ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. सदर दोन मृत्यूनंतर कोरोनाचे जिल्ह्यात आतापर्यंत २२६ बळी गेल्याची नोंद आहे.


या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे रविवारी (ता. २७) ८० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यातील मूर्तिजापूर येथील १३, अकोट येथील सात, छोटी उमरी, डाबकी रोड व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, मोठी उमरी, बोरगाव मंजू, जीएमसी, शास्त्रीनगर व ओझोन येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर येथील चार, खडकी, कौलखेड, गांधीग्राम व बार्शीटाकळी येथील दोन, तर उर्वरित कान्हेरी सरप, तुकाराम चौक, लेबर कॉलनी जूने तारुफैल, खडकी, रामनगर, पिंपरी खु., वाशिम बायपास, मोठी उमरी व रतनलाल प्लॉट, जोगळेकर प्लॉट, हिंगणारोड, श्रीवास्तव चौक, डोंगरगाव, गजानन नगर, नानक नगर, कोठारी वाटिका, पत्रकार कॉलनी ,जुनेशहर, पाथर्डी अकोट ,वरुर अकोट, कुटासा, शिवापुर, कानेरी, रंजना नगर, आदर्श कॉलनी, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


६१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रविवारी (ता. २७) ३१ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १६ जण, युनिक हॉस्पीटल येथून एक, आयुर्वेदीक महाविद्यालयातून पाच, हॉटेल स्कायलॉक येथून दोन तर कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सहा जणांना अशा एकूण ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ७१८८
- मृत - २२६
- डिस्चार्ज - ५४३२
- ॲक्टिव्ह रुग्ण - १५३१

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com