esakal | खरिपाची झाली माती, रब्बीला पाणी मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rabbi did not get water for kharif

यावर्षी खरिपामध्ये अवकाळी पावसाने शेतपिकाची माती केली असताना आता वाढत्या भारनियमनाने रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत.

खरिपाची झाली माती, रब्बीला पाणी मिळेना

sakal_logo
By
दत्तात्रय शिंदे

पांगरी नवघरे  ः यावर्षी खरिपामध्ये अवकाळी पावसाने शेतपिकाची माती केली असताना आता वाढत्या भारनियमनाने रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत.

पांगरी परिसरातील वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, आधी खरीप गेले आता रब्बीलाही धोका होईल का, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये भिनली आहे.

मालेगाव तालुक्यात ३३ के.व्ही. उपकेंद्र असून, १५ पेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा केला जातो. परंतु, त्यातून निम्म्या गावांच्या शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. क्षमतेपेक्षा अधिक अवैध वीजजोडण्या करून त्या रोहित्रावर भार निर्माण करण्याचे काम सध्या वीजवितरण या कंपनीकडून होत आहे.

कुठलाही शेतकरी येतो, कोटेशन भरतो. त्याच १०० के.व्ही.वर आपले कनेक्शन जोडण्याकरिता वीज वितरण कंपनीच्या वतीने त्याला परमिशन देण्यात येत असते पण, आज घडीला ज्या पूर्वीचे शेतकरी हे आपले रोहित्र उभे करत असतात त्यांना फार अडचणी येतात, कारण हेच रोहित्र जळाले की, परत यासाठीच पैसे मोजावे लागतात आणि ते पैसे ही शेतकऱ्यांना द्यावे लागतात.

वेळीच उपाययोजना करून संबंधित कोटेशनधारक जर एका १०० के.व्ही. ट्रांसफार्मर किती व्यक्तीच्या मोटरपंप असू शकतात याचे एक अंदाजपत्रक करून तेवढेच त्या डीपीसाठी लागू करावे, जेणेकरून बिघाड व दुरुस्तीचा खर्च शेतकऱ्यांना खर्च करण्याचे काम राहणार नाही. नवीन कोटेशनधारकांना त्यासाठी योग्य तो ट्रांसफार्मर उपलब्ध करून द्यावा, नाहीतर त्यांना योग्य ती समज देऊन योग्य कारवाई करावी. जेणेकरून त्यांच्यापासून इतरांना त्रास होणार नाही. अवेळी, अवकाळी पावसामुळे तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले असून, आजपर्यंत बळीराजा हवालदिल झाला आहे.

अशा परिस्थितीत आता सर्वस्व रब्बीवर अवलंबून असून, रब्बीच्या पिकासाठी योग्य व सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी पांगरी नवघरे येथील विजय घोडे, विवेक नवघरे, नारायण वाझुळकर, राम नवघरे, विष्णू माधव नवघरे शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image