‘उमेद’ प्रकल्प चौकशीच्या रडारवर

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 3 November 2020

लघु व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल. परंतु, तालुक्यावर आपल्या मर्जीतील अधिकारी, कर्मचारी बसविल्यामुळे हा सर्व आराखडा कागदावरच चालविला जात असल्याने ‘उमेद’ प्रकल्पाला ग्रहण लागले आहे.

मानोरा (जि.वाशीम)  ः तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या अभियानास शासन दरबारी मोठ्या प्रमाणात वाजागाजा केला गेला. परंतु, या अभियानास कर्मचाऱ्यांनी ‘उमेद’ प्रकल्पाला नाउमेद केल्या गेले, असा आरोप जनतेतून होत आहे. खऱ्या अर्थाने उमेद प्रकल्प राबविल्या गेल्यास तालुक्यातील गरीब जनता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही.

लघु व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल. परंतु, तालुक्यावर आपल्या मर्जीतील अधिकारी, कर्मचारी बसविल्यामुळे हा सर्व आराखडा कागदावरच चालविला जात असल्याने ‘उमेद’ प्रकल्पाला ग्रहण लागले आहे. या संदर्भात आता जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी या प्रकल्पाची चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

याआधी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये तालुक्यात अनेक तक्रारी झाल्या. माहितीचे अधिकार टाकण्यात आले. परंतु, त्यांना न्याय मिळाला नाही का? याला जबाबदार कोण? सन २०१९/२०२० मध्ये तालुक्यात किती ग्राम संघ तयार झाले ते मात्र कागदपत्री आहेत.

परंतु, ग्रामपातळीवर वेगळीच स्थिती पाहवयास मिळते. जे ग्राम संघ तयार झाले व जे समूह ग्रामसंघाला जोडले ते समुह दशसुत्रीच नाही. त्याचे लेखी रेकार्ड अद्यावत नाही, ज्यांनी फिरतनिधी व कर्ज घेतले असेल त्यांनी योग्य विनियोग केला नाही. त्याचप्रमाणे ७० टक्के पेक्षा जास्त गरीब महिला समूहात असणे गरजेचे आहे. अनेक समुह ग्रामसंघ तयार केले परंतु, त्यांचे प्रस्ताव बँकेत सादर केले नाही, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.

याबाबत ‘सकाळ’ने वृत प्रकाशित केले होते. त्या वृतांची दखल घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे प्रकल्प संचालक यांना आदेश देऊन उमेद प्रकल्पाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा सूचना केली. त्यामुळे उमेद प्रकल्प चौकशीच्या रडारवर आहे.

तालुक्यातील जनतेला आता न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. गटविकास अधिकारी यांनी सोमवारी (ता.२) उमेद प्रकल्प कार्यालयास भेट दिली असता कार्यालयातील पुस्तिका येथे शेरा मारण्यात आला. यामध्ये कार्यालयात बरेच कर्मचारी हजर नाही त्यांनी हजर नसल्याबद्दल खुलासा सादर करावा, बाहेर गावी जाताना परवानगी घ्यावी, प्रस्ताव सादर करताना गटविकास अधिकारी यांच्या परवानगीसाठी अशा सूचना करण्यात आल्या.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Umed project on investigation radar!