Akola : प्रतिक्विंटल सात हजाराहून कमी भाव; कापूस उत्पादक अडचणीत

हजारो क्विंटल जुना कापूस घरात, नवा ठेवायचा कुठे?
Akola Cotton Price
Akola Cotton Price esakal

Akola : वर्षभरापूर्वी कापसाला रेकॉर्डब्रेक १४ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात कापसाचे पीक घेतले. मात्र, पीक हाती आल्यानंतर प्रतिक्विंटल सात हजाराहून कमी भाव मिळत असल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी गेल्यावर्षीचा हजारो क्विंटल कापूस अजूनपर्यंत घरात साठवून ठेवला.

आता चालू हंगामातील कापूसही निघणार आहे. मात्र, सध्याही क्विंटलला सात हजाराहून कमी भाव मिळत असल्याने कापूस विकायचा कसा आणि जुनाच कापूस घरात असल्याने नवीन कापूस ठेवायचा कुठे? अशा दूविधेत कापूस उत्पादक शेतकरी सापडले आहेत.

Akola Cotton Price
Pregnancy Travel Tips : गरोदरपणात प्रवास करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

अकोल्यासह विदर्भातील शेती पांढरे सोने (कापूस) व पिवळे सोने (सोयाबीन) उगवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये काही दशकांपूर्वी कापसाचे उत्पादन सर्वाधिक व त्यापाठोपाठ सोयाबीनचे उत्पादन व्हायचे. मात्र, आता सोयाबीनची लागवड जवळपास दोन ते सव्वा लाख हेक्टर व कापसाची दीड लाख हेक्टर पर्यंत लागवड होते.

Akola Cotton Price
Travels Bus Accident : मोठी दुर्घटना!कोकरूड-नर्ले पुलाजवळ खाजगी बसला अपघात; ४० प्रवासी करत होते बसमधून प्रवास

वर्षभरापूर्वी मात्र, कापसाला प्रति क्विंटल आजपर्यंतचा सर्वाधिक १६ हजार रुपयांपर्यत भाव मिळाल्याने कापूस उत्पादकांना प्रोत्साहन मिळाले होते व त्याचाच परिणाम स्वरुप गेल्या वर्षी दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली. उत्पादनही चांगले झाले मात्र, भाव कोसळला आणि सहा ते सात हजार रुपयात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागला.

Akola Cotton Price
Kargil Travel Destinations :  युद्धासाठीच नाहीतर या ठिकाणांसाठीही ओळखले जाते कारगिल, एकदा फोटो पहाल तर प्रेमातच पडाल

आज ना उद्या भाव वाढतील या अपेक्षेणे शेकडो शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापूस घरातच ठेवला. तो कापूस अजूनही घरातच पडून असून, सुरू हंगामातील कापूस सुद्धा निघण्यावर आहे. मात्र, अजूनही प्रतिक्विंटल सात हजाराहून कमी भाव मिळत असल्याने कापूस विकावा की नाही आणि विकला नाही तर, नवा कापूस ठेवायचा कुठे? अशा अडचणीत जिल्ह्यातील शेतकरी सापडले आहेत.

Akola Cotton Price
ECHS Health Scheme: सैनिक हो तुमच्यासाठी! ‘ईसीएचएस’साठी कालावधीत वाढ

उत्पादनापेक्षा खर्च अधिक

कापूस उत्पादनासाठी एकरी ३५००० ते ४०००० रुपये खर्च येतो. मात्र, जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरासरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन होत असल्याने व सध्याचा प्रतिक्विंटल ७ हजार रुपये भाव लक्षात घेता एकरी ३० हजार रुपये शेतकऱ्यांच्या हाती येत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा पाच ते दहा हजार रुपये तोटा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

Akola Cotton Price
Health Care News: या योगासनांमुळे रक्ताभिसरणाची प्रकिया राहते सुरळीत, जाणून घ्या

एकरी कापूस उत्पादन खर्च

नांगरणी १४००

कल्टीव्हेटर ७००

रोटर ७००

कापूस बियाणे (दोन पाकीट) १६६०

लागवड मजूरी ६४०

खत ४५००

खत टाकणे मजूरी १९२०

किटकनाशक ५०००

फवारणी खर्च ५०००

डवरणी फेर २५००

निंदण खर्च ४०००

कापूस वेचाई ७०००

वाहतूक खर्च १०००

अडत १०००

शेणखत १०००

एकूण...३६,४२० रुपये

Akola Cotton Price
Health Care News: गरोदरपणात 'या' पोषक पदार्थांचा आहारात समावेश करा; आईबरोबरच बाळही निरोगी राहील

मागच्या वर्षीचा ५० क्विंटल कापूस अजूनही घरात पडून आहे. मागील वर्षाच्या डिसेंबरपासून कापसाला भाव नाही. नवीन कापूस सुद्धा आला असून, ठेवायचे वांदे आहेत. सरकारने आतातरी ठोस पावले उचलावी ही अपेक्षा.

-डीगांबर गावंडे, कापूस उत्पादक शेतकरी, रसुलाबाद

चालू भावात कापूस विकावा तर या भावात मजूरी व शेती पेरणीचा खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे विकताही येत नाही आणि तो कापूस खराबही होत आहे. शेतकऱ्यांनी काय करावे हे तरी सरकारने सांगावे.

- विठ्ठल माळी, कापूस उत्पादक शेतकरी, बाखराबाद

Akola Cotton Price
Health Care News: मुलांचं मानसिक नुकसान करतंय इंटरनेटचं व्यसन, डिप्रेशन अन् एन्झायटीचं प्रमाण वाढलं

या वर्षी कापूस वेचणी ९ रुपये किलोवर गेली. मागील वर्षीचा कापूस अजून घरात आहे. येत्या महिनाभरात चांगला भाव मिळाला नाही तर, कापूस पेटून देईल व परत कापूस कधी पेरणार नाही.

- देवानंद पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, बाखराबाद

जुन्या कापसामुळे अंगाला खाज सुटत आहे. घर लहान असल्याने मुलं सुद्धा कापसावर खेळतात त्यामुळे छोटे किडे कानात जाण्याची भिती आहे. सरकारने गांभिर्याने विचार करून योग्य भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल.

- संदीप इंगळे, कापूस उत्पादक शेतकरी, मोरगाव भाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com