Akola : जिल्ह्यात सुरू होणार स्वच्छतेचा जागर!

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानesakal

अकोला : नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
Akola : अतिपावसाने टोमॅटोचा हंगाम लवकर आटोपला

त्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला जाणार आहे.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने नुकतेच संत गाडगे ग्राम स्वच्छता अभियानाबाबत ७ आॕक्टोबर रोजी शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
Akola : विमा कंपनीने पुसली तोंडाला पाने

त्यानुसार अभियानाला ११ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियान जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छता शाश्वत टिकण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा - २ अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशा प्रकारच्या सर्व कामामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांना अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
Akola : गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल बनला

जिल्ह्यात स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत सर्वसमावेशक स्पर्धा राबवून त्यामाध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमातील आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरीता जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
Akola : जीवरक्षकांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

गावात शाश्वत स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्व ग्रामपंचायती, नागरिक, गाव व तालुकास्तरीय कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीनी सक्रीय सहभागी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
Akola : भोंदू तांत्रिक बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

स्वच्छ ग्राम अंतर्गत मिळणार पुरस्कार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत सभागी गावांना पुरस्कार देण्यात येणार आहे.जिल्हा परिषद गटातील - प्रथम क्रमांक ग्रा.पं. स्तर ६० हजार रुपये, जिल्हा स्तरावरील प्रथम पुरस्कार ६ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार चार लाख रुपये व तृतीय पुरस्कार तीन लाख रुपये देण्यात येईल.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
Akola : भोंदू तांत्रिक बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

विभागस्तरीय प्रथम पुरस्कार १२ लाख रुपये, व्दितीय पुरस्कार ९ लाख तर तृतीय पुरस्कार सात लाख देण्यात येईल.राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार ५० लाख, व्दितीय ३५ लाख व तृतीय ३० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com