esakal | बलिदानाच्या कृतज्ञतेने हेलावले पोलिस मुख्यालय
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim Corona News 60 lakh assistance to heirs of deceased Corona warriors

 कोरोनाच्या कहरात जनतेला कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी तो रात्रं-दिवस झटला, अंगावर खाकी चढवून घराबाहेर पडताना दरवाज्याआड त्याची वाट पाहणाऱ्या डोळ्याकडेही कानाडोळा केला. मात्र, त्यालाच कोरोनाने गाठले उपचार सुरू झाले मात्र, तो हरला. कोरोना जिंकला घरावर आभाळ कोसळले, भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. 

बलिदानाच्या कृतज्ञतेने हेलावले पोलिस मुख्यालय

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम :  कोरोनाच्या कहरात जनतेला कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी तो रात्रं-दिवस झटला, अंगावर खाकी चढवून घराबाहेर पडताना दरवाज्याआड त्याची वाट पाहणाऱ्या डोळ्याकडेही कानाडोळा केला. मात्र, त्यालाच कोरोनाने गाठले उपचार सुरू झाले मात्र, तो हरला. कोरोना जिंकला घरावर आभाळ कोसळले, भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे गजानन कळणू वानखेडे कोरोनाचे बळी ठरले. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संवेदनशिलतेने एका महिन्यात गजानन वानखेडे यांच्या चिल्या-पिल्याच्या हाती ६० लाखांची मदत सोपवून पालकत्वाचा परिचय दिला आहे.


कोरोना लाॅकडाऊनच्या काळामधे २४ तास कर्तव्य बजावत पोलिस दलातील शिलेदारांनी आपल्या प्राणाची बाजी लावत कोरोनाला प्रतिबंध केला. दोन-तीन दिवस घरातील चिल्या-पिल्यांची भेट न घेता कर्तव्य निभावत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन वानखेडे हे कर्तव्यतत्पर कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. पोलिसातील देवमाणूस ही उपाधी प्रत्येक बिटमधे त्यांना मिळत होती.

हेही वाचा - Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!

मात्र, कर्तव्य बजावत असतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. अवघ्या पंचेचाळीशीतील गजूभाऊ उपचारानंतर घरी परत येतील अशी आशा असताना, कोरोनाने त्यांचा बळी घेतला. कुटुंबावर आभाळ कोसळले मात्र, त्यावेळीही पोलिस दल पाठीशी धावले. मात्र, त्यानंतर सरकारी मदत मिळविण्यात अनंत अडचणीच्या अनुभवाचे बोल अनेकांनी बोलून दाखविले.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

परंतु, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी अतिषय संवेदनशिलतेने गजानन वानखेडे यांच्या वैयक्तिक अपघात योजनेचा प्रस्ताव तडकाफडकी शासनदरबारी पाठवून पाठपुरावा सुरू केला. या योजनेतून पन्नास लाखांचे विमाकवच प्राप्त झाले. याबरोबरच दहा लाखांचे सानुग्रह अनुदानही मंजूर केले. हा धनादेश वितरण करण्याचा भावूक कार्यक्रम परवा पोलिस मुख्यालयातील जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या दालनात पार पडला. गजानन वानखेडे यांच्या पत्नी व मुलांना साठ लाखाचा धनादेश देताना दालनानेही कृतज्ञतेचा उसासा सोडला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, गृह पोलिस उपअधीक्षक श्रीराम घुगे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांची उपस्थीती होती. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या कर्तव्यतत्परतेने पोलिस दलात समाधान दिसून येत आहे.

अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

loading image