दुर्धर आजारग्रस्तांना मिळणार १५ हजार अनुदान!

Akola Zilla Parishad News 15,000 grants will be given to those suffering from chronic diseases!
Akola Zilla Parishad News 15,000 grants will be given to those suffering from chronic diseases!

अकोला : ग्रामीण भागात हृदयरोग,कॅन्सर किडनीग्रस्त रुग्णांना मदतीचा हात म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अशा रुग्णांना १५ हजारांची मदत केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात ५९ रुग्ण सदर योजनेसाठी पात्र ठरले असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.


जिल्ह्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या व आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या अशा दुर्धर आजार जडलेल्या रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने २०२०-२१ या वर्षात प्रत्येकी १५ हजार रुपये मदत देण्याचे नियोजन केले आहे.
त्याप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने अशा रुग्णाकडून आवेदन अर्ज मागविले होते.यामध्ये पहिल्या टप्प्यात १९५ अर्ज प्राप्त झाले आहेत.यामध्ये १३५ अर्ज अपात्र ठरले असून प्रत्यक्षात ५९ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.तर उर्वरित अर्ज प्रतीक्षा यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.तर अनेकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडल्याने अशांना आजार असून सुद्धा अपात्र राहण्याची वेळ आली आहे.याबाबत जिल्हा परिषदेणे काही तोडगा काढल्यास उर्वरीत लाभार्थ्यांना सुद्धा लाभ मिळू शकतो.
--------------------
योजनेवर ५० लाखांची तरतूद!
जिल्ह्यातील दुर्धर आजार जडलेल्या रुग्णांना मदतीचा हात म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत केली जात आहे.सदर योजनेवर ५० लाखांची तरतूद केली आहे.आतापर्यंत ५९ लाभार्थ्यांना मदत मिळाल्याची माहिती असून यावर ८ लाख ८५ हजार खर्च झाले आहेत.तर उर्वरित रक्कम मार्च अखेर खर्च करावी लागणार आहे.त्यामुळे आरोग्य विभाग याबाबत कुठला निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com