खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश

खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला ः पालकांकडून अत्यधिक शुल्क वसुल करणाऱ्या केशव नगर येथील एमरॉल्ड स्कूलसह इतर तीन खासगी शाळांचे सन् २०१६ पासून लेखापरीक्षण करा, असे निर्देश शालेय शिक्षण विभाग व इतर विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. (Audit private schools, instructed by Bachchu Kadu)

शालेय शिक्षण विभागाचे व इतर शासकीय विभागांचे राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार अमोल मिटकरी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व इतरांची मंचावर उपस्थिती होती.

खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश
युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते

आढावा सभेत पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केशव नगर येथील एमरॉल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अन्यायाचा पाढा वाचला. शाळेमध्ये शुल्क वसुलीच्या नावावर पालकांची लुट सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारच्या तक्रारी इतर तीन शाळांच्या व्यवस्थापना संदर्भात सुद्धा प्राप्त झाल्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी आर्थिक वर्ष २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० मधील शाळेचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश बैठकीत दिले.

खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश
शेतकऱ्यांची फसवणूक करून होतेय बी-बियाणे व खतांची विक्री

लेखापरीक्षणासाठी पथक गठित करुन त्यामध्ये विधी व न्याय सेवा प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश करावा, लेखापरीक्षणाचा अहवाल तयार झाल्यानंतर धर्मदाय आयुक्तांना दाखवावा, असे निर्देश यावेळी दिले.

खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश
नियोजन करा, बाजार समितीला दरवर्षी दोन कोटी देतो-बच्चू कडू


उपस्थिती २५ टक्के नसल्यास त्यांना निलंबित करा
कोरोना महामारीच्या काळात सर्वात कमी काम करणारा शासकीय कर्मचारी म्हणजे शिक्षक होय, असे सभेत पालकमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले. या स्थितीत शिक्षकांची शाळांमध्ये किमान २५ टक्के उपस्थिती (आठवड्यातून दोन दिवस) राहावी, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यामुळे कोरोनाकाळात शाळेत न गेलेल्या व उपस्थितीती २५ टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा, असे निर्देश सुद्धा पालकमंत्री बच्चू कडू यांनी सभेत शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना दिले.

खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश
अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा


वेतन २० टक्के कपातीचा निर्णय विचाराधीन
कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी सर्वात कमी काम केले. त्यामुळे त्याचे वेतन २० टक्क्यांनी सरसकट कापावे, असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्यावर सहमती झाल्यास सर्वच शिक्षकांच्या वेतनामध्ये कपात करण्यात येईल, असेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत सांगितले.

खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी चाचपणी सुरू

बैठकीतून ठाणेदाराला फोन
शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत एमरॉल्ड स्कूलच्या त्रासाला वैतागलेल्या पालकांनी अन्यायाचा पाढा वाचला. तक्रार दिल्यानंतर सुद्धा शाळेवर कारवाई होत नसल्याचे पालकांनी सांगितले. पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी थेट खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासोबत मोबाईलवर संवाद साधला व या प्रकरणाची माहिती घेत चौकशी पूर्ण करुन दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.

संपादन - विवेक मेतकर

Audit private schools, instructed by Bachchu Kadu

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com