esakal | अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा

अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला, ता.१४ ः जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणी क्षेत्र लक्षात घेता कृषी विभागाने ७० हजार १४७ क्विंटल बियाण्याची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केवळ ५६ हजार ५०३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता अधिक असून, शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. (Seed shortage in Akola district)

यावर्षी एप्रिल, मे मध्ये निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ व ‘यास’ वादळांमुळे काही प्रमाणात मॉन्सूनचा प्रवास विस्कळीत झाला, तरीसुद्धा मे च्या शेवटच्या आठवड्यात पूर्व मोसमी पावसाची काही ठिकाणी हजेरी लागली. लवकरच मॉन्सून व पेरणी सुद्धा जोर धरेल, या अपेक्षेतून शेतकऱ्यांनी सुद्धा बी-बियाणे, खते इत्यादी कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. मात्र, कृषी सेवा केंद्र, बियाणे विक्रेत्यांकडे अजूनही आवश्‍यक बियाणेसाठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होत आहे.

हेही वाचा: आमदार-नगरसेवकांचा राग स्वच्छतेवर काढू नका

जिल्ह्यातील खरीप पेरणी क्षेत्र लक्षात घेता कृषी विभागाकडून कृषी आयुक्तालयाकडे ७० हजार १४७ क्विंटल बियाण्याची मागणी केली होती. परंतु, आतापर्यंत केवळ ५६ हजार ५०३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. त्यापैकी २६ हजार २४३ क्विंटल बियाण्याची १४ मे पर्यंत विक्री झाली असून, लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आठवडाभरात बियाणे खरेदीला जोर येणार आहे. परंतु, मागणीपेक्षाही १३ हजार ६४४ क्विंटल बियाण्याचा पुरवठा कमी झाल्याने बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा: शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी

महाबीजच्या बियाण्याची शोधाशोध
शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये दर्जेदार बियाणे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची उभारणी करण्यात आली असून, सर्वाधिक सोयाबीन बियाण्याचा पुरवठा महाबीजकडूनच केला जातो. यावर्षी जिल्ह्यासाठी २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन महाबीजने केले आहे. मात्र, त्यापैकी आतापर्यंत केवळ ११ हजार ३५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला असून, १० हजार २०० क्विंटलची विक्री सुद्धा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची आता शोधाशोध करावी लागत असून, बहुतांश ठिकाणी बियाणे उपलब्ध नसल्याचे बियाणे विक्रेते सांगत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत.

हेही वाचा: मुकसंमती; आता एचटीबिटी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर


जिल्ह्यासाठीचे बियाणे नियोजन, मागणी, पुरवठा व विक्री
जिल्ह्यात गेल्यावर्षी खरिपात चार लाख ५५ हजार २६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी कृषी विभागाने वाढीव चार लाख ७१ हजार ६८५ हेक्टरवर पेरणीची शक्यता लक्षात घेत ८० हजार ८५९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन आखले होते. मात्र, कृषी आयुक्तालयाकडे केवळ ७० हजार १४७ क्विंटल बियाण्याचीच मागणी नोंदविली. ५६ हजार ५०३ क्विंटल बियाण्यांचा आतापर्यंत पुरवठा झाला असून, त्यापैकी २६ हजार २४३ क्विंंटलची विक्री झाली आहे.

हेही वाचा: कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार?

कपाशी बियाण्याची सर्वाधिक विक्री
यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४७ हजार हेक्टरवर बीटी कपाशी लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने आखले होते. त्यासाठी सात लाख १८ हजार ९६१ बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली होती. मात्र, केवळ चार लाख ८१ हजार ४३९ पाकिटांचा आतापर्यंत पुरवठा झाला असून, त्यापैकी चार लाख एक हजार ३१९ बियाणे पाकिटांची विक्रीसुद्धा झाली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Seed shortage in Akola district

loading image