
नुकतेच जिल्हा परिषदे माफत दिवंगत आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रशस्ती पत्रावर आबांचे नाव व छायाचित्र नसल्याचा प्रकार उघडकीस आले.
देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : नुकतेच जिल्हा परिषदे माफत दिवंगत आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रशस्ती पत्रावर आबांचे नाव व छायाचित्र नसल्याचा प्रकार उघडकीस आले.
आता शासनाने तालुकास्तरावर 20 लाख व जिल्हास्तरावर 50 लाखांची घोषणा केली असताना जिल्हा परिषदेच्या माफत 10 लाख व 40 लाखांची घोषणा करण्यात आली.
शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने निर्गमित केलेले आदेश व जिल्हा परिषदेने प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या वृत्तात तफावत आढळून आली असून राज्याच्या राजकीय पटलावर स्वच्छ प्रतिमा निर्माण करून गेलेल्या आबांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या सुंदर ग्राम पुरस्कार प्रक्रियेत सावळा गोंधळ पहावयास मिळत आहे. तर, ही जर स्थानिक चूक असेल तर कारभार किती गलथान याचा प्रत्यय येत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागामाफत जिल्ह्यातील 13 तालुक्यात सुंदर गाव पुरस्कारासाठी आवश्यक निकष तसेच अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करणार्या 13 गावांना दिवंगत आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरित करण्यात आले. सदर पुरस्कारातील महत्त्वपूर्ण असलेल्या प्रमाणपत्रात दिवंगत आर. आर. आबा यांच्या नावाचा उल्लेख नव्हता आणि त्यांच्या छायाचित्राचा ही विसर जिल्हा परिषद प्रशासनाला पडला. परिणामी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. आबांच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
सदर योजने संदर्भात शासनाची घोषणा आणि जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाच्या घोषणेत तफावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान प्रशासनाने सुंदर गाव पुरस्काराचे थातुरमातूर वितरण सोहळा उरकून जिल्ह्यातील 13 गावांच्या डोळ्यात धूळफेक केली असून आपल्या हयातीत जनहिताच्या योजना पूर्णत्वास नेण्याचा करिता गांभीर्याने प्रयत्न करणारे आबा यांच्या नावाने दिल्या जाणार्या पुरस्काराचे स्वरूप आणि वितरण सोहळ्याला सहजतेने घेण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चक्क बक्षीस रक्कमेच तफावत
राज्य शासनाने स्मार्ट ग्राम योजनेचे दिवंगत आर. आर. आबा पाटील सुंदरगांव पुरस्काराच्या रकमेत वाढ केली. जिल्हा स्तरावर 40 ऐवजी 50 लाख तसेच तालुकास्तरावर 10 ऐवजी वीस लाखांची घोषणा करण्यात आली. मात्र, जिल्हा प्रशासनाने पूर्वीच्याच 40 व 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले.
गावांची प्रमाणपत्र देऊन बोळवण
पुरस्कार वितरण करताना पुरस्कार विजेते गावांना केवळ प्रशस्तिपत्र देऊन बोळवण करण्यात आली. पुरस्काराची रक्कम उपलब्ध झाल्यावर वितरण केले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धिपत्रक पुरस्काराची रक्कम वितरण केल्याचे जाहीर करण्यात आले. पुरस्काराची रक्कम न देता प्रसिद्धी माध्यमांद्वारे सदर 10 लाखांचे वितरण झाल्याचे भासविण्यात आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे सुंदर गाव योजनेत सावळा गोंधळ असल्याचे पहावयास मिळत आहे. दिवंगत आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार योजनेसंदर्भात शासन व जिल्हा परिषद प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.
शासनाने दिवंगत आर. आर. आबा पाटील पुरस्कारातील रक्कम वाढविल्या संदर्भात जिल्हा परिषदेकडे अद्याप नवीन परिपत्रक प्राप्त झाले नाही. सुंदर गाव पुरस्कारातील पुरस्कार राशी मार्च महिन्यात शासनाकडून निधी प्राप्त झाल्या नंतर संबंधित पुरस्कार विजेते गावांना वितरित करण्यात येणार आहे.
- राजेश लोखंडे, उपकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर
|
|||