तेल्हारा; भांबेरी येथे वडील आणि मुलाची हत्या

कळवा येथे मतिमंद मुलांची हत्या करून आईची आत्महत्या
कळवा येथे मतिमंद मुलांची हत्या करून आईची आत्महत्या

तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील ग्राम भांबेरी (Bhamberi) येथे आपसी वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला त्यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसर्‍यास गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला. यामुळे ग्राम भांबेरी येथील आजची पहाट रक्तरंजीत ठरली या घटनेने तेल्हारा तालुका पार हादरून गेला असून या प्रकरणी तेल्हारा पोलीसांनी गुन्हा दाखल करून चार संशयिताला ताब्यात घेतले आहे. (Death of father and son at Bhamberi in Telhara taluka)

तेल्हारा तालुक्यातील ग्राम भांबेरी येथे 29 मे रोजी सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास यातील नमूद आरोपी भीमराव भोजने यांच्या मुलाने फिर्यादीच्या सुनेला पळवून नेले. या जुन्या वादावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

कळवा येथे मतिमंद मुलांची हत्या करून आईची आत्महत्या
Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील 'अन्नपेढी'स मदतीचा हात!

या आपसी वादातून आरोपीतांनी संगणमत करून कुऱ्हाड व लोखंडी पाईप, सब्बलने मारहाण करुण फिर्यादीचे पती देविदास उकर्डा भोजने (वय 57 वर्षे) व मुलगा अजय देविदास भोजने (24 वर्ष) विजय देविदास भोजने वय( 23 वर्ष) व प्रमिला देविदास भोजने (वय 45 वर्ष) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. याची माहिती येणारा पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले. या हल्ल्यात देविदास उकर्डा भोजने (वय 57 वर्षे) यांचा रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच मृत्यू झाला असून मुलगा अजय भोजने याला गंभीर अवस्थेत तेल्हारा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला पुढील इलाज कामी अकोला येथे हलविले असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

कळवा येथे मतिमंद मुलांची हत्या करून आईची आत्महत्या
इंग्रजी राजवटीतील दुर्मिळ १० हजाराची नोट जपलीय अकोल्याच्या संग्रहात

बापलेकाच्या हत्येमुळे तालुका हादरला असून याप्रकरणी तक्रारदार प्रमिला देविदास भोजने वय 45 वर्ष राहणार भांबेरी यांच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी भादवी च्या वेगवेगळ्या कलमान्वये आप्पा उर्फ भीमराव गणपत भोजने,सौ प्रमिला भीमराव भोजने, राजू उर्फ राजेश गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने सर्व सर्व रा भांबेरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

कळवा येथे मतिमंद मुलांची हत्या करून आईची आत्महत्या
जागा 17, उमेदवार दोनशे, नियुक्तीसाठी पोहचलेल्या परिचारिकांचा गोंधळ

या प्रकरणातील वरील चारही संशयितांना तेल्हारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून तक्रारदार प्रमिला देविदास भोजने यांच्या तक्रारीवरून पोलीस नाईक रामेश्वर राऊत यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Death of father and son at Bhamberi in Telhara taluka

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com